बॉलिवूडमधील नव्या कपलच्या घरी सध्या चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन होताना दिसत आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूर, वरुण धवन, कियारा आडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले. त्या पाठोपाठ आता कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला चार वर्षांनंतर घरी पाळणा हालणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहते आतुरतेने बेबी कतरिना किंवा बेबी कौशलच्या आगमनाची वाट पाहत आहेत. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की विकी आणि कतरिनाच्या घरी लवकरच बाळाचा किलबिलाट ऐकू येणार आहे. चला, या व्हायरल पोस्टमागील सत्य जाणून घेऊया…
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे. पण त्यांना अभिनंदन करण्यापूर्वी हे जाणून घ्या की ही बातमी खरी आहे की नाही. या बातमीला अद्याप पुष्टी मिळालेली नाही, परंतु सोशल मीडियावर असा दावा करणारी एक पोस्ट व्हायरल होत आहे. असे सांगितले जात आहे की बेबी कतरिना किंवा बेबी कौशल यंदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येणार आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही 2025 मध्ये तिघांचे कुटुंब होणार आहोत.’
वाचा: 40 वर्षे भीक मागितली! पैसे मोजायला लागले 6 तास, एकूण रक्कम किती झाली हे ऐकून धक्काच बसेल
मात्र, त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल्सवर यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तरीही, या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण झाली असून, चाहते बाळाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित बातम्यांवर चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कतरिना विकीसोबत अलिबागला जाताना दिसली होती आणि तिने ओव्हरसाइज शर्ट घातले होते. हा व्हिडीओ पाहूनही लोकांनी कतरिना गरोदर असल्याचा अंदाज बांधला होता. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
आता पुन्हा एकदा ही बातमी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर विकी आणि कतरिनाचा एक फोटो दिसत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की 2025 मध्ये आम्ही तिघांचे कुटुंब होणार आहोत. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये लहानसा पाहुणा घरी येऊ शकतो. या फोटो किंवा बातमीचा स्रोत काय आहे, याचा काहीच पत्ता लागत नाही. तरीही लोकांनी यावर अभिनंदनाचा ओघ सुरू केला आहे.
विकी आणि कतरिनाने दिली नाही प्रतिक्रिया
वाढत्या चर्चांनंतरही, कतरिना आणि विकी यांनी या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या खासगी बाबींवर गुप्तता राखली आहे. तरीही चाहत्यांना याबाबत त्यांच्याकडून काही माहिती मिळेल याची प्रतीक्षा आहे. पण हेही लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की सत्य उघड करायचे, न करायचे किंवा कधी करायचे हा निर्णय फक्त आणि फक्त हे दोघेच घेऊ शकतात. तोपर्यंत त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांनी संयमाने प्रतीक्षा करायला हवी.