खासदारांसह प्रवाशांचा जीव टांगणीला, Air Indiaचं विमान आधी वळवलं, उतरवताना रनवेवर समोर दुसरं विमान, २ तास हवेतच
esakal August 11, 2025 03:45 PM

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांच्यास अनेक खासदारांना घेऊन तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला येणारं विमान अचानक चेन्नईला वळवण्यात आलं. रविवारी रात्री हवामान बिघडल्यानं आणि तांत्रिक त्रुटींमुळे हा निर्णय घेतला होता. चेन्नईला विमान वळवलं पण तिथे उतरवण्याच्या वेळी एकाच रनवेवर दोन विमानं आल्याचं समजल्यानं काही काळ विमान हवेतच थांबवावं लागलं. यामुळे खासदारांसह प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

एअर इंडियाचं विमान तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला निघालं होतं. या विमानाची दुर्घटना थोडक्यात टळलीय. खराब हवामानामुळे एक तांत्रिक त्रुटी आढळून आली. यामुळे विमान चेन्नईला उतरवण्याचा निर्णय घेतला. पण तिथेही नवं संकट निर्माण झालं. एकाच रनवेवर दोन विमानं आल्यानं पुन्हा हवेत नेण्यात आलं. काही काळ विमान हवेतच घिरट्या मारत होतं. शेवटी AI2455 विमान चेन्नईत सुखरुपपणे उतरवलं. या विमानाची आवश्यक ती तपासणी केली जाईल.

Pune : रक्षाबंधनाला भाऊ रिकामा आला तर जीवे मारू, नवऱ्याच्या धमकीनंतर २७ वर्षीय विवाहितेनं संपवलं आयुष्य

विमानाने तिरुवनंतपुरम विमानतळावरून उड्डाण केलं होतं. काही वेळातच ते टर्ब्युलन्सच्या तडाख्यात सापडलं. यामुळे विमानाला चेन्नईच्या दिशेनं वळवण्यात आलं. रात्री ८ वाजता विमानाने उड्डाण केलं होतं. तर रात्री १०.३५ वाजता चेन्नईत उतरवलं. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. एअर इंडियाने प्रवाशांची माफी मागत आवश्यक ती मदत केली जाईल आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देत आहोत असं सांगितलं.

काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल राव यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, या विमानात अनेक खासदार आणि शेकडो प्रवासी होते. रात्री उशिरा सुरू झालेला प्रवास त्रासदायक ठरला. उड्डाणानंतर मोठा गोंधळ झाला. जवळपास तासाभराने कॅप्टनने सिग्नलमध्ये बिघाड असल्याचं सांगितलं आणि विमान चेन्नईच्या दिशेनं वळवलं. त्यानंतर २ तास विमान उतरवण्यासाठी परवानगी नव्हती. विमानतळाभोवतीच घिरट्या मारत राहिले. एकाच रनवेवर दोन विमानं आली, सुदैवाने पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचा जीव वाचला. दुसऱ्या प्रयत्नात विमान खाली उतरलं आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.