एका फुटबॉल मैदानाच्या आकाराची लॅबोरेटरी अंतराळात आपल्या पृथ्वीभोवती वेगाने फिरत असते. जिला आपण इंटरनेशनल स्पेस स्टेशन म्हणत असतो. या प्रयोगशाळेच वजनच तब्बल ४३० टन इतक असून ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ४०० किलोमीटर उंचीवरुन पृथ्वीला प्रदक्षिणा मारत आहे. पृथ्वीभोवती २८ हजार किलोमीटर प्रति तास वेगाने फिरणाऱ्या या प्रयोगशाळेचे लाँचिंग साल १९९८ मध्ये करण्यात आले होते. आता पर्यंत २६ देशांचे २८० अंतराळवीर ISS वर जाऊन आले आहेत.
परंतू नासा आता या अजस्र प्रयोगशाळेला प्रशांत महासागरात कोसळवण्याच्या तयारीत आहे. याचे कारण हे आहे की ISS चे प्रायमरी स्ट्रक्चर सारखे मॉड्युल, ट्रस आणि रेडिएटर खराब होत आहेत आणि साल २०३० नंतर हीचा वापर करणे धोकादायक आणि महागडा होत जाणार आहे. अनेक पर्यायांवर विचार केल्यानंतर प्रशांच महासागराच्या पॉईंट निमो येथे या अंतराळ प्रयोगशाळेला कोसळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पॉईंट निमो दक्षिण प्रशांत महासागरातील एक असे क्षेत्र आहे. जे पृथ्वीच्या सर्वात एकांत क्षेत्रापैकी एक मानले जाते. मनुष्यच नव्हे तर पक्षी देखील याच्या आसपास भटकत नाहीत. न्युझीलंडच्या पूर्व कोस्टपासून ३००० मैल आणि अंटार्टीकापासून २००० मैल दूरवर बराच काळापासून निवृत्त झालेल्या सॅटेलाईट आणि अंतराळ यानाची दफनभूमी तयार झाली आहे. तेथे या अंतराळ प्रयोगशाळेला कोसळवण्यात येणार आहे. ISS चे संचलन नासा, रोस्कोस्मोस, ईएसए, जेएक्सए आणि कॅनडीयन अंतराळ एजन्सी करते. आता यास डिऑर्बिट करण्याची जबाबदारी देखील यांचीच आहे.
बीबीसीच्या अहवालानुसार, १५० अब्ज डॉलरच्या किंमत असलेल्या या स्पेस स्टेशनला डिऑर्बिट करण्यासाठी स्पेसएक्स डिऑर्बिट व्हेईकल तयार करणार आहे. हे एक असे विशेष अंतराळ यान आहे जे ISS ला नियंत्रित पद्धतीने पॉईंट निमोपर्यंत घेऊन जाणार आहे. याच सोबत ISS चा ३० वर्षांचा शानदार प्रवास संपणार आहे.
नासाने ISS ला पाडण्याचा निर्णय घेण्याआधी अन्य पर्यायांचा देखील विचार नक्कीच केला होता. पहिल्यांदा असे ठरले होते की या ISS ला अधिक उंचीच्या कक्षेत ढकलून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऐतिहासिक अवशेष म्हणून ते कायमचे अंतराळात फिरत राहीले असते. ISS जेथे आहे तेथे अंतराळात त्याची कोणाशी टक्कर होण्याचा धोका ५० वर्षातून एकदा आहे. परंतू अधिक उंचावर नेल्यास हाच धोका चार वर्षातून एकदा वा त्याहून अधिक देखील होऊ शकतो.
सीएनएनच्या वृत्तानुसार या शिवाय यावर देखील विचार केला गेला की ISS ला त्याच्या कक्षेतच विघटीत करावे आणि नंतर याला पुन्हा आणून त्याचे म्युझियम किंवा संशोधनासाठी जतन करावे. परंतू हे जवळपास अशक्य होते. यात प्रचंड मोठा निधी आणि अंतराळवीरांचा प्राण जोखीमेत टाकल्यासारखे झाले असते. त्यामुळे हा निर्णय टाळण्यात आला. त्यामुळे त्याऐवजी डिऑर्बिट ( प्रशांत महासागरात पाडणे ) केल्यानंतर जळण्यापासून वाचलेले तुकडे एकत्र करण्याची योजना तयार केली आहे.
इंटरनेशनल स्पेस स्टेशन ही एकमेव लॅबोरेटरी होती ,जेथे संपूर्ण जगभरातील अंतराळवीर जाऊन मायक्रोग्रॅव्हीटीवर संशोधन करत होते. परंतू असेही नाही ही याला पाडल्यानंतर कोणतेच स्पेस स्टेशन राहणार नाही. वास्तविक नासाचा प्रयत्न हा आहे की आता खाजगी कंपन्यांच्या मदतीने स्पेश स्टेशनना मागणी नुसार वापरायचे. एक्सिओम स्पेस, ब्लु ऑरिजिन आणि व्हॉएजर सारख्या खाजगी कंपन्या याच दिशेने काम करीत आहेत.
दुसरीकडे चीन हा एकमेव असा देश आहे ज्याच्याकडे आता वर्कींग स्पेश स्टेशन तियांगोंग आहे. रशिया देखील साल २०३३ पर्यंत त्यांचे स्वत:चे स्पेस स्टेशन बांधण्याच्या योजनेवर काम करत आहे.
भारताने देखील साल २०३३ पर्यंत स्वत:चे स्पेस स्टेशन बनविण्याचे ध्यैय ठेवले आहे. येथे हे स्पष्ट केले पाहीजे की पृथ्वीवर कोसळताना ISS बहुतांश भाग जळून खाक होणार आहे. आणि पॉईंट निमोच्या पोटात ISS कायम स्वरुपी दफन होणार आहे.
नुकताच भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हा अंतराळात जाऊन आला. अॅक्सिओम-४ अंतराळ मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारा हा दुसरा भारतीय ठरला आहे. या पूर्वी १९८४ मध्ये स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हा पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात जाऊन आला होता.
लखनौमध्ये जन्मलेल्या ग्रुप कॅप्टन शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात प्रवास करणारे पहिलेच भारतीय अंतराळवीर ठरले. १९८४ मध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या सॅल्युट-७ अंतराळ स्थानकाचा भाग म्हणून राकेश शर्मा यांनी कक्षेत आठ दिवस घालवल्यानंतर ४१ वर्षांनी कोणा भारतीयाने अंतराळात प्रवास केला आहे.