Pankaja Munde : लातूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लातूरमध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी आपले वडील म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण, त्यांची दूरदृष्टी यावरही त्यांनी भाष्य केले. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले, त्याआधी त्यांना दिलेल्या वचनाबद्दलही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भावुक झाल्या.
लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाल्यानंत पंकजा मुंडे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना मला बरेचजण सांगतात की माझी कार्यपद्धती ही गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी नाही. मी ते मान्य करते. कारण माझी काम करण्याची पद्धत ही माझ्या वडिलांना जशी हवी होती, तशीच आहे. आज श्रावणी सोमवार आहे. आज मला उपवास आहे. मी वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आले आहे. आज मला माझ्या पित्याच्या पुतळ्याचं अनावरण करता आलं, अशा भावना यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या बाजूलाच स्वर्गीय विलासराव देशमुख यांचाही पुतळा आहे. या दोन्ही नेत्यांनी प्रांजळ राकारणाचं मूर्तीमंत उदाहरण या जोडीने उभं केलेलं आहे. या दोन्ही नेत्यांत मैत्री होती. पण त्यांनी एकमेकांच्या पक्षांशी कधीच प्रतारणा केली नाही. ते दोघेही एकमेकांच्या विरोधात लढले. मी पालकमंत्री असताना विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण मी पालकमंत्री असताना झाले, अशीही आठवण यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितली.
मला गोपीनाथ मुंडे यांनी हजारवेळा सांगितलेलं आहे की तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं आपण ती सुधारित आवृत्ती असली पाहिजे. त्यामुळे मला जसं वाटतं तसं तू काम कर. बऱ्याचवेळा मला जसं वाटतं तसं काम करता येत नाही, असं त्यांनी मला सांगितलं होतं. म्हणूनच तत्त्वांशी, समान्य माणसांच्या हिताशी प्रतारणा न करता, स्वाभिमान गहाण न ठेवण्याचं वचन मी माझे पिता मृत होण्याआधी त्यांना दिलेलं आहे. या वचनावर मी शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करत राहील, असं वचनही पंकजा मुंडे यांनी जनतेला दिले.