Asia Cup 2025 : हार्दिक पंड्या फिटनेस टेस्टमध्ये पास की फेल? श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादवबद्दल मोठी अपडेट
Tv9 Marathi August 11, 2025 08:45 PM

आशिया कप स्पर्धा जवळ येतेय. या पार्श्वभूमीवर टीम इंडियातील काही खेळाडूंची फिटनेस टेस्ट सुरु झाली आहे. आशिया कप मल्टीनॅशनल टुर्नामेंट आहे. भारताकडून ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणारे काही खेळाडू पूर्णपणे फिट आहेत का? हा प्रश्न आहे. आशिखा खंडात क्रिकेटमध्ये किंग कोण? हे या स्पर्धेत ठरणार आहे. पण टीम इंडियाचे काही खेळाडू या टुर्नामेंटसाठी फिट आहेत का? हा मुख्य प्रश्न आहे. त्या खेळाडूंचा फिटनेस रिपोर्ट कसा आहे?. या बाबतीत हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे.

हार्दिक पंड्या फिटनेस टेस्टमध्ये पास होणार की फेल?. हे पुढच्या 48 तासात समजणार आहे. रिपोर्टनुसार 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट हे दोन दिवस हार्दिकसाठी महत्त्वाचे आहेत. फिटनेस टेस्ट देण्यासाठी हार्दिक पंड्या बंगळुरुत NCA मध्ये पोहोचला आहे. NCA मध्ये आल्याची माहिती हार्दिक पंड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

श्रेयस अय्यरचा रिपोर्ट काय?

श्रेयस अय्यर बद्दल बातमी आहे की, त्याने आपली फिटनेस टेस्ट पास केली आहे. त्याची टेस्ट 27 ते 29 जुलै दरम्यान झाली. श्रेयस अय्यर आपला शेवटची टी 20 आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये खेळला होता. आता तो आशिया कप स्पर्धेदरम्यान टीममध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. भारताच्या या मधल्याफळीतील फलंदाजाने देशांतर्गत टुर्नामेंट आणि आयपीएलमध्ये परफॉर्म करुन T20 टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी दावा ठोकला आहे.

सूर्यकुमार यादवबद्दल अपडेट काय?

भारताच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवबद्दल अपडेट आहे. तो अजून पर्यंत पूर्णपणे फिट नाहीय. त्याला रिकव्हर होण्यासाठी अजून एक आठवडा लागू शकतो. म्हणजे अजून एक आठवडा तो फिजियो आणि मेडिकल स्टाफच्या देखरेखीखाली NCA मध्येच राहणार. जूनच्या सुरुवातीला सूर्यकुमार यादवचा हर्णियाचं ऑपरेशन झालेलं.
आशियाची कपची सुरुवात 9 सप्टेंबरला UAE मध्ये होणार आहे. 21 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होऊ शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.