KTM ची भारतातली सर्वात स्वस्त बाईक लाँच, Pulsar आणि Apache ला जोरदार
GH News August 12, 2025 12:21 AM

KTM ने भारतात आपली सर्वात स्वस्त नवीन बाईक 160 ड्यूक लाँच केली आहे. या ब्रँडची ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त मोटरसायकल आहे.ही कंपनीच्या लाईनअप मधील KTM 200 ड्यूकचे छोटे मॉडेल आहे. ही बाईक Bajaj Pulsar NS160, Yamaha MT-15 V2.0 आणि TVS Apache RTR 200 4V ला जोरदार टक्कर देणार आहे.

सध्या केटीम इंडियाच्या ताफ्यात KTM 1390 सुपर ड्यूक R, KTM 890 ड्यूक R, KTM 390 ड्यूक, KTM 250 ड्यूक आणि KTM 200 ड्यूक अशा तगड्या बाईक आहेत. आधी केटीएम कंपनी KTM 125 ड्यूक देखील विकत होती. परंतू मार्च 2025 मध्ये हिचे उत्पादन बंद केले आहे. आता नवीन 160 ड्यूक या लाईनअपमध्ये नवे मॉडेल आहे.

किंमत आणि वॉरंटी

नव्या KTM 160 ड्यूकची किंमत 1.85 लाख (एक्स-शोरूम) आहे. कंपनी या बाईकसह 10 लाखांची वॉरंटी देत आहे. आणि खरेदीसाठी फायनान्शिय ऑप्शन देखील उपलब्ध होणार आहेत. 12 ऑगस्टपासून ही नवीन बाईक डिलरकडे पोहचण्यास सुरुवात होत आहे. या कंपनीने म्हटले आहे की सर्वसाधारण मोटरसायकल नसून एक स्पोर्ट्स बाईक आहे. ड्युक सिरीजची विक्री आधीच खूप वाढलेली आहे आणि 160 ड्यूक आल्याने यात आणखीन वाढ होत आहे. सोबतच कंपनी RC 160 वर देखील काम करीत आहे. जी या ब्रँडची स्वस्त RC बाईक असणार आहे. आणि काही आठवड्यात ती लाँच होणार आहे.

डिझाईन आणि फिचर्स

या कंपनीच्या मते या नव्या 160 ड्यूक बाईकला ब्रँडच्या खास फिलॉसफीसह डिझाईन केले गेले आहे. ही 160 ccची नॅकेड बाईक आहे. ज्यात हाय परफॉर्मेंस आणि प्रिमियम स्पोर्टी लूकचा समतोल आहे. बाईक मध्ये सिग्नेचर KTM LED हेडलँप, शार्प टँक कव्हर, रुंद फ्यूअल टँक, स्लीक टेल सेक्शन आणि LED टेललाईट देण्यात आली आहे. रंगाचा विचार करता यात ऑरेंज-ब्लॅक आणि ब्ल्यु -व्हाईट ( ऑरेंज हायलाईट्स सह ) कलर ऑप्शन मिळणार आहेत. बाईकमध्ये 5.0 इंचाचा LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे. ज्यात स्मार्टफोन कनेक्टीव्हीटी, टर्न-बाय-टर्न नेव्हीगेशन, कॉल रिसिव्ह आणि म्युझिक प्ले सारखी सुविधा दिलेली आहे.

इंजिन आणि पॉवर

नवीन 160 ड्यूक बाईक भारतातील सर्वात पॉवरफुल 160cc बाईक म्हटले जात आहे. यात 160cc लिक्विड-कूल्ड इंजिन आगहे. जे 200 ड्यूकच्या प्लॅटफॉर्मवरुन घेतले आहे. इंजिन 18.74 bhp ची पॉवर आणि 15.5 nm टॉर्क जनरेट करते. या हेच इंजिन आणि चेसिस येणाऱ्या KTM RC 160 देखील वापरले जाणार आहे. बाईकमध्ये USD फ्रंट फोर्क्स आणि मागे मोनोशॉक दिलेला आहे. बेक्रींगसाठी पुढे 320 मिमी डिस्क ब्रेक आणि पाठी 230 मिमी डिस्क ब्रेक दिलेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.