नालासोपारा सेक्स रॅकेटमधून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका.
पीडित मुलगी बांगलादेशची असून, तीन महिन्यांत २०० हून अधिक अत्याचार.
पोलिस व एनजीओच्या संयुक्त कारवाईत १० आरोपींना अटक.
हार्मनी फाउंडेशनने सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी दुष्कृत्य केल्याची माहिती दिली.
१२ वर्षीयचिमुकलीमुळची बांगलादेश येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. २६ जुलै रोजी पोलिसांनी धाड टाकत अल्पवयीन मुलीची सुटका केली. तसेच सेक्स रॅकेट चालवणाऱ्या नराधमांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्यानं या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
इंडिया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा, मतचोरीविरूद्ध राहुल गांधींसह ३०० खासदारांचा एल्गार; मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार?मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांनी धाड टाकत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. तसेच या रॅकेटच्या संबंधित १० जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेसंदर्भात हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहम मथाई म्हणाले, '१२ वर्षीय चिमुकलीचे रिमांड होममध्ये काउन्सलिंग करण्यात आले आहे. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिनं सगळा प्रकार सांगितला. तिला गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले होते. नंतर तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी तिचं लैंगिक शोषण केलं'.
कामाची भूलथाप, तृतीयपंथीयासह तिघांकडून आळीपाळीनं बलात्कार; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?' ही चिमुकली शाळकरी विद्यार्थी आहे. एका विषयात ती नापास झाली होती. आई वडील मारतील किंवा ओरडतील या भीतीपोटी तिनं घर सोडलं. बांगलादेशहून भारतात आली. काही लोकांना मुलगी एकटी दिसली. मदतीची भुलथाप देत तिला वेश्याव्यवसायात ढकललं.' दरम्यान, मथाई यांनी पोलिसांकडे २०० पुरूषांना अटक करण्याची मागणी केली आहे.