मोठी बातमी समोर आली आहे, 15 ऑगस्ट स्वातत्र्य दिनी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची अधिकृत यादी आता समोर आली आहे. या यादीनुसार रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार आहेत. 26 जानेवारीला देखील त्यांनीच ध्वजारोहण केलं होतं. दरम्यान यावेळी मंत्री भरत गोगावले हे ध्वजारोहणासाठी उत्सुक होते, यावेळी ध्वजारोहणाची संधी मला मिळेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र यावेळी देखील ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांनाच मिळाला आहे. त्या 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी त्या -त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते त्या- त्या जिल्ह्यात ध्वजारोहण होते. पंरतु सध्या रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद सुरू आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट दोन्हीही पक्षांकडून रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी उत्सुक आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील येथील दावा सोडला नसून, आदिती तटकरे यांचं नाव पालकमंत्री पदासाठी चर्चेत आहे. तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वाद सुरू असल्यानं दोन्ही जिल्ह्यात ध्वजारोहण नेमकं कोण करणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यासंदर्भातील अधिकृत पत्रक देखील आता समोर आलं आहे. रायगडमध्ये पुन्हा एकदा आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार आहेत,
रायगडमधील पालकमंत्र्याचा तिढा अजूनही सुटला नाहीये, मंत्री भरत गोगावले यांनी आधीच म्हटलं होतं की, यावेळी ध्वजारोहणाची संधी मला मिळेल. पालकमंत्रिपद मला मिळेल असंही ते वारंवार म्हणत आहेत, पंरतु शासनाकडून ध्वजारोहणासाठी पालकमंत्र्यांची जी यादी जारी करण्यात आली आहे, त्यामध्ये रायगडमध्ये आदिती तटकरे याच 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रायगडचा तिढा वाढण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. दुसरीकडे भाजपकडून नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा करण्यात आला आहे, नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार आहेत.