पाकिस्तानच्या महिला क्रिकेटपटूनेही अनेक दिवसांची प्रतिक्षा संपवली. मात्र त्यानंतरही बाबर आझम याची प्रतिक्षा कायम आहे. पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू मुनीबा अली हीने आयर्लंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात शतक ठोकलं. मुनीबाने यासह 907 दिवसांची प्रतिक्षा संपवली. मुनीबाने अखेरचं शतक हे 15 फेब्रुवारी 2023 रोजी ठोकलं होतं. ( Photo: PTI/Getty images)
मुनीबाने आयर्लंड विरुद्धच्या या खेळीत 14 चौकार आणि 1 षटकार लगावला. अर्थात मुनीबाने 62 धावा या चौकार आणि षटकारच्या मदतीने केल्या. मुनीबाने यासह चौकार-षटकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा करण्याचा स्वत:चा विक्रम आणखी भक्कम केला. Photo: PTI/Getty images)
मुनीबा पाकिस्तानसाठी टी 20i क्रिकेटमध्ये (महिला+पुरुष) सर्वाधिक शतकं करणारी एकूण दुसरी फलंदाज ठरली आहे. या यादीत बाबर पहिल्या स्थानी आहे. मुनीबाने पाकिस्तानसाठी टी 20i मध्ये सर्वाधिक शतकांबाबत मोहम्मद रिझवान याला पछाडलं. रिझवानने टी 20i मध्ये एकमेव शतक केलं आहे. तर मुनीबाच्या टी20i कारकीर्दीत 2 शतकांची नोंद आहेत. तर पाकिस्तानसाठी टी 20i मध्ये सर्वाधिक 3 शतकांचा विक्रम हा बाबर आझम याच्या नावावर आहे. ( Photo: PTI/Getty images)
मुनीबा अली हीने या शतकासह अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली. मुनीबाने टी 20i मध्ये शतक लगावलं. तर दुसऱ्या बाजूला बाबर आझम याची वनडे क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शतक करण्याची प्रतिक्षा कायम आहे. बाबरला वनडेत शतक करुन आता 710 पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. ( Photo: PTI/Getty images)
मुनीबाने आयर्लंड विरुद्ध 68 चेंडूत शतक झळकावलं. मुनीबाने याने खेळीत 14 चौकार आणि 1 षटकार लगावला. मुनीबाच्या या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने सामना जिंकला आणि लाज राखली. आयर्लंडने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. ( Photo: PTI/Getty images)