शाहरुख खान, जुही चावला, प्रिती झिंटा यांसारख्या बॉलिवूड कलाकारांनी आत्तापर्यंत आयपीएलमध्ये गुंतवणूक केलेली आहे.
मात्र, सलमान खानने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये रस दाखवलेला नाही.
याबाबत आता सलमान खाननेच प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) सध्या १० संघ खेळतात. या संघांच्या मालकांबद्दलही नेहमीच स्पर्धेदरम्यान चर्चा असते. अनेक संघमालक स्टेडियममध्ये हजेरीही लावतात. आयपीएलमधील काही संघांची मालकी ही बॉलिवूड कलाकारांकडेही आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची मालकी शाहरुख खान आणि जुही चावलाकडे आहे, तसचे प्रीती झिंटा पंजाब किंग्सची मालकिण आहे. मात्र बॉलिवूडमधील सुपरस्टार असूनही सलमान खानने कधी आयपीएलमधील संघ खरेदी करण्यात रस न दाखवल्याबाबत नेहमीच चाहत्यांच्या मनात उत्सुकता राहिली आहे. याबाबत आता त्यानेच भाष्य केले आहे.
IPL Trade Rules Explained : संजू सॅमसनला CSK बरोबर जाण्याची इच्छा, चेन्नईसुद्धा उत्सुक... मग घोडं अडलंय कुठं? काय सांगतो आयपीएलचा ट्रेड नियम?सलमानने असाही खुलासा केला की त्याला आयपीएल संघ खरेदीबाबत ऑफरही होती. आयपीएलची लोकप्रियता पाहाता आगामी काळात स्पर्धेत संघांची संख्याही वाढू शकते. काही वर्षांपूर्वीच ही संघ ८ वरून १० करण्यात आली आहे. अशातच भविष्यात आयपीएल संघ खरेदी करण्यात रस आहे का, असं सलमन खानला मुंबईतील एका कार्यक्रमात विचारण्यात आलं होतं.
याबाबत सलमानने त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. तो आधी म्हणाला, 'आयपीएलसाठी आता मी खूप वयस्कर झालोय.' त्यानंतर यापूर्वी २००८मध्ये ऑफर आलेली हे सांगताना सलमान म्हणाला, 'त्यावेळी ऑफर आली होती, पण मी ती स्वीकारली नाही. असं नाहीये की मला याबाबत पश्चाताप आहे, मी आत्ताही आनंदीच आहे.'
View this post on InstagramA post shared by Buzzzooka Prime (@buzzzookaprime)
दरम्यान, आत्तापर्यंत शाहरुख खान आणि जुही चावला यांची मालकी असलेला कोलकाता संघ आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यानंतरचा सर्वात यशस्वी संघ आहे. तसेच प्रीती झिंटा मालकीण असलेल्या पंजाब किंग्सनेही नुकतेच आयपीएल २०२५ मध्ये उपविजेतेपद मिळवले होते.
IPL 2025 : पंजाब किंग्सने Salman Khan ला केले ट्रोल; म्हणाले, भाई! पॉइंट टेबल चेक करसलमानचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गालवान' असणार आहे. भारत - चीन यांच्यात २०२० मध्ये झालेल्या गालवान खोरे तणावावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात काम करणं आत्तापर्यंत शारिरीकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक असल्याचे सलमानने सांगितले आहे. हा चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सलमानने सांगितले.
याशिवाय बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या सिक्वेलवरही सध्या काम सुरू असल्याचे सलमानने सांगितले आहे.
➤FAQsसलमान खानने आयपीएल संघ खरेदी का केला नाही?
(Why did Salman Khan not buy an IPL team?)
➤ सलमान खानने २००८ मध्ये आयपीएल संघ खरेदीची आलेली ऑफर नाकारली आणि त्याबाबत पश्चाताप नाही असे सांगितले.
सलमान खानने आयपीएलबद्दल काय म्हटलं?
(What did Salman Khan say about the IPL?)
➤ सलमान खानने सांगितले की आयपीएलसाठी तो आता खूप वयस्कर झाला आहे.
कोणते बॉलिवूड कलाकार आयपीएल संघांचे मालक आहेत?
(Which Bollywood stars own IPL teams?)
➤ शाहरुख खान, जुही चावला आणि प्रीती झिंटा हे आयपीएल संघांचे मालक आहेत?
सलमान खानचा पुढील चित्रपट कोणता आहे?
(What is Salman Khan’s next movie?)
➤ सलमान खानचा पुढील चित्रपट ‘बॅटल ऑफ गालवान’ प्रदर्शित होणार आहे.