- rat११p१६.jpg-
२५N८३६५३
राजापूर ः शिबिरामध्ये दाखल्यांचे वाटप करताना तहसीलदार विकास गंबरे.
गावातच दाखले, रेशनकार्डचे वितरण
राजापूर तालुका ; बँकखात्यांच्या केवायसीही केल्या अपडेट
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ ः महसूल विभागामार्फत तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात महाराजस्व अभियान राबवण्यात आले असून, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. संजय गांधी निराधार व अन्य योजनांतर्गत लाभ घेणाऱ्या वयोवृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बँकखात्यांच्या केवायसी अपडेट केल्याची माहिती तहसीलदार विकास गंबरे यांनी दिली.
महसूल सप्ताहात प्रत्येक दिवशी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकांतील नागरिकांसाठी विशेष मोहीम, कार्यक्रम उपक्रम, शिबिरे, महसूल अदालती यांचे आयोजन करण्यात आले. हे कार्यक्रम सर्व मंडळ अधिकारीस्तरावर प्रभावीपणे राबवण्यात आले. शासकीय जागेवर २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणे या कार्यक्रमासह पाणंद शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले गेले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय विशेष साहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात आले. मंडळनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आले असून, त्यात २०४ उत्पन्न, ३३ अधिवास, १८ राष्ट्रीयत्व, २७ नॉनक्रिमिलेअर, १८ जातीचे प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक २७ इतर दाखले यांचे वाटप करण्यात आले. तसेच महसुली गावातील खातेदारांना सातबारा, ८ अ तसेच फेरफार यांचेही वाटप केले, असे गंबरे यांनी सांगितले.