Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात पावसाची विश्रांती, विदर्भात धो धो, वाचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज
Saam TV August 12, 2025 02:45 AM
  • पुणे - मुंबईत पावसाची विश्रांती

  • हवामान विभागाचा अंदाज – हलक्या सरी, पण मुसळधार पावसाची शक्यता कमी.

  • कोकण, विदर्भात १२ ते १४ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज.

  • गडचिरोली आणि यवतमाळसाठी १३-१४ ऑगस्टला ऑरेंज अलर्ट.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर लक्षणीयरीत्या कमी झालेला आहे. तसेच मुंबईत देखील पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यात हवामानात बदल जाणवू लागला असून, दिवसाच्या वेळी उकाडा वाढला आहे तर रात्री गारवा जाणवत आहे. दुपारनंतर वातावरण ढगाळ होत असले तरी पावसाच्या केवळ हलक्या सरीच होत आहेत.

भारतीय हवामानशास्त्रविभागाच्या नोंदीनुसार, गेल्या आठवड्यात पुण्यात फक्त आठ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याने पुणेकरांना चांगलीच ओल मिळाली होती, तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यातही समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र जुलैच्या उर्वरित दिवसांत आणि आता ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत पावसाने फारशी साथ दिलेली नाही.

Maharashtra Weather: सतर्क रहा! राज्यात पुढील ५ दिवस धो-धो पावसाचे; ४ जिल्ह्यात रेड अलर्ट

सध्याच्या परिस्थितीवर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात पुण्यात पावसासाठी फारसे अनुकूल वातावरण राहणार नाही. आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून हलक्या सरी पडतील, मात्र मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. मात्र या आठवड्यातील हवामानाच्या घडामोडींमध्ये बुधवार, १३ ऑगस्टला बंगालच्या वायव्य उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रणालीमुळे राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वाढेल.

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

१२ ऑगस्ट ते १४ ऑगस्टदरम्यान विदर्भ तसेच कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १३ ऑगस्टला मुंबईपरिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, तर १४ ऑगस्टला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागातही यावेळी पावसाची तीव्रता वाढू शकते.

Monsoon Snacks : यंदाच्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा हे फेमस आणि कुरकुरीत भजी

विदर्भातील गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी १३ आणि १४ ऑगस्टला भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे - मुंबईत मात्र सध्या पावसाऐवजी उष्णतेची लाट अनुभवायला मिळत असल्याने, जून महिन्यातील संततधार पावसाची प्रतीक्षा पुणेकर करत आहेत.

पुण्यात गेल्या आठवड्यात किती पाऊस झाला?

केवळ आठ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने पुण्यासाठी काय अंदाज दिला आहे?

हलक्या सरी पडतील, परंतु मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.

राज्यातील कोणत्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे?

कोकण, विदर्भ, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे?

गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी १३ आणि १४ ऑगस्टला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.