पळसदेव परिसरात वृक्ष लागवड
esakal August 13, 2025 01:45 PM

पळसदेव, ता. १२ : पळसदेव (ता. इंदापूर) येथील पर्यावरणप्रेमी किरण गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वड, पिंपळ, करंज, खया यासारख्या देशी वृक्षांची लागवड केली. गतवर्षी सुरू केलेला हा उपक्रम कायम सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी खुडे म्हणाले, ‘‘जन्मदिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक काम करण्याचा मानस ठेवून गायकवाड यांनी राबविलेला वृक्षारोपणचा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. समाजातून वृक्षारोपण व संवर्धनावर काम करणाऱ्यांनी पुढे येऊन परिसरात असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.’’ याप्रसंगी बाळासाहेब काळे, कैलास भोसले, राजेंद्र काळे, हनुमंत खांडेकर, सूर्यकांत कचरे, सुजित मोरे, सागर शेलार आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.