Eknath Shinde, Aditya Thackeray May Share Stage at BDD Chawl Event : गेल्या तीन वर्षांत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. शिवसेनेतील बंडानंतर दोन्ही गटात आरोपी प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सुरु आहे. अशातच आता आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
१४ ऑगस्ट रोजी मुंबईतील वरळी येथे बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत 556 लाभार्थ्यांना घरे वितरीत करण्यात येणार आहेत. माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या वितरित करणार आहेत.
Uddhav Thackeray : संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या मंत्र्यांच्या ‘भ्रष्टाचार पे चर्चा करा’; शिवसेना उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहनया कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार असून प्रोटोकॉल नुसार वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. जर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आले, तर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे नेते एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असेल. गेल्या तीन वर्षांपासून या दोघांमध्ये तीव्र मतभेद आहेत, आणि त्यामुळे हा क्षण राजकीयदृष्ट्या खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ब्रिटिश काळात 1920 ते 1925 या कालावधीत मुंबईत बॉम्बे डिव्हेलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत बांधण्यात आलेल्या या इमारती आता जर्जर झाल्या होत्या. त्यामुळे या चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाला.
Eknath Shinde: खड्डे बुजणार, घोडबंदर मार्गावरील कोंडी कायमची सुटणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाणेकरांसाठी खूशखबरपुढे महायुती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पुढे गेला. आता हा पहिला टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला आहे. त्यामुळे यावरून श्रेयवादाची लढाई बघायला मिळण्याचीही शक्यता आहे.