मासिक पाळीच्या वेळी मंदिरात जाण्याबद्दल कंगना राणौत स्पष्टच बोलली; म्हणाली 'मला फार घाण…'
Tv9 Marathi August 16, 2025 08:45 PM

बॉलिवूड अभिनेत्रीकंगना राणौत प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे आपले मत व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मासिक पाळी दरम्यान देखील तिचे मत स्पष्ट केले आहे. स्वच्छता राखण्याच्या मुद्द्यावर उघडपणे तिने भाष्य केले आहे. तिने सांगितले की, ती एक अभिनेत्री असल्याने तिला शूटिंग दरम्यान अशा वेळी सर्व प्रकारच्या सुविधा आणि सुखसोयी उपलब्ध असतात परंतु हे प्रत्येकासाठी सारखे नसते. मासिक पाळी दरम्यान महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याच्या मुद्द्यावरही कंगना राणौतने तिचे मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे. ती लहान असताना तिला या गोष्टींबेद्दल काय सांगितलं गेलं याबद्दल देखील ती बोलली आहे.

तिने मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही कारण…’

कंगना राणौत म्हणाली की, जेव्हा ती लहान होती तेव्हा तिलामासिक पाळीच्या वेळी मंदिरात जाऊ नये असे सांगितले जात असे. यावेळी ती हसत म्हणाली, की, “असा कोणताही त्रास दिला जात नव्हता, आम्हाला फक्त आराम करायला सांगितला जायचा” ती म्हणाली, “त्या काळात मी कधीही मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही, कारण मला खूप घाणेरडं वाटायचं. त्यावेळी मला सर्वांना चापट मारायची इच्छाही व्हायची. त्यावेळी माझी आई आमच्याबद्दल खूप संवेदनशील असायची.”

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)


“जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल तर…”

कंगना राणौत म्हणाली, “लोक मंदिरात किंवा स्वयंपाकघरात जाण्यासाठीही विरोध करतात. मला वाटतं जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल तर तुम्ही जावे. मी माझ्या घरात एकटी राहते, म्हणून मला जावेच लागेल. म्हणून ज्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही त्यांना स्वयंपाकघरात जावेच लागते.” कंगना राणौतनेही नकारात्मक आणि सकारात्मक उर्जेशी जोडून हे स्पष्ट केले.

कंगना म्हणाली की हे तुमच्या भल्यासाठी आहे

अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा एखादी महिला दुःखाच्या स्थितीत असते तेव्हा त्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. म्हणूनच अनेक महिला देवासमोर जाण्याची इच्छा बाळगत नाहीत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कोणासाठी जेवण बनवले नाही तर ते त्यांच्या कल्याणासाठी आहे. खरं तर, हीच वेळ आहे तुमच्यासाठी विश्रांती घेण्याची.” असं म्हणत कंगना मासिक पाळीच्या दरम्यान ती फक्त श्रद्धा किंवा तिला सांगितेले गेले आहेत म्हणून मंदिरात जाणे टाळायची नाही तर तिला स्वत:ला अस्वच्छ जाणवायचं म्हणून ती जाणे टाळायची.

दरम्यान कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, ‘इमर्जन्सी’ नंतर कंगना राणौतच्या कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा झालेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.