6,6,6,6,6,6, Dewald Brevis चा झंझावात, ऑस्ट्रेलिया विरुद्ध वादळी खेळी, पाहा व्हीडिओ
GH News August 16, 2025 09:14 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या टी 20I सामन्यात स्फोटक शतक करुन असंख्य रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या युवा डेवाल्ड ब्रेव्हीस याने तिसऱ्या सामन्यातही तडाखा कायम ठेवत झंझावाती खेळी केली. डेवाल्डने दक्षिण आफ्रिकेसाठी करो या मरो अशा दुसऱ्या सामन्यात नाबाद 125 धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 50 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने कांगारुंना लोळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली होती. त्यानंतर आता डेवाल्डने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात स्फोटक अर्धशतक ठोकलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 170 पार मजल मारता आली.

कर्णधार एडन मारक्रम 1 तर लुहान डी प्रिटोरियन 24 धावांवर बाद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची स्थितीत 32 धावांवर 2 विकेट्स अशी झाली. त्यानंतर डेवाल्ड चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला 49 धावावंर तिसरा झटका दिला. रायन रिकेल्टन 13 रन्सवर आऊट झाला.

चौथ्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

त्यानंतर डेवाल्ड आणि ट्रिस्टन स्टब्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला आणि टीमला 100 पार पोहचवलं. डेवाल्डने या भागीदारी दरम्यान चौफेर फटकेबाजी करत कांगारुंच्या गोलंदाजांना घाम फोडला. तर ट्रिस्टन स्टब्स यानेही डेवाल्डला चांगली साथ दिली. डेवाल्डने या चौकार आणि षटकारांच्या मदतीने झंझावाती अर्धशतक ठोकलं. डेवाल्ड ज्या वेगाने धावा करत होता त्या हिशोबाने तो सलग दुसरं शतक ठोकणार की काय? असंच वाटत होतं. मात्र नॅथन एलिस याने ही सेट जोडी फोडली आणि धावांवर मोठा ब्रेक लावला. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेला 200 पार पोहतचा आलं नाही.

डेवाल्ड आणि स्टब्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी 61 रन्सची पार्टनरशीप केली. नॅथन एलिसने डेवाल्डला ग्लेन मॅक्सवेल याच्या हाती 12 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर कॅच आऊट केलं. डेवाल्डने 200.85 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. डेवाल्डने या 53 पैकी 40 धावा या सिक्स आणि फोरच्या मदतीने केल्या. डेवाल्डने 1 चौकार लगावला. तर डेवाल्डने तब्बल 6 सिक्स ठोकले.

डेवाल्डची फटकेबाजी, कांगारुंची धुलाई

ऑस्ट्रेलियासमोर 173 धावांचं आव्हान

दरम्यान डेवाल्ड व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेसाठी वॅन डर डुसेन याने नाबाद 38 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स याने 25 तर लुहान डी प्रिटोरियसने 24 धावांचं योगदान दिलं. तसेच रायन रिकेल्टन याने 13 धावा केल्या. तर इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. आता ऑस्ट्रेलिया 173 धावांचं आव्हान पूर्ण करत सामन्यासह मालिका जिंकणार की दक्षिण आफ्रिका सलग दुसर्‍या विजयासह सीरिजवर नाव कोरणार? हे थोड्या वेळेतच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.