Senior Player Jealous of Irfan Pathan Batting at No.3 भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने एक मोठा खुलासा केला आहे. आपण जेव्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचो, तेव्हा एक वरिष्ठ खेळाडू आल्यावर जळत होता, असं तो म्हणाला. एका मुलाखतीत बोलताना त्याने यासंदर्भात भाष्य केलं आहे. इरफान पठाणच्या या विधानानंतर क्रिकेटविश्वातही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
काय म्हणाला इरफान पठाण?इरफान पठाण म्हणाला, की ''मी ज्यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचो, तेव्हा एक वरिष्ठ खेळाडू माझ्यावर जळत होता. तेव्हा मी काहीही बोललो नाही, कारण मी तरुण खेळाडू होतो. नुकताच संघात आलो होतो. तो खेळाडू स्वतःला माझ्यापेक्षा चांगला फलंदाज समजत होता. तसंच 'हा मी असताना हा वरच्या क्रमांकावर फलंदाजीला का जातो?, असं तो सारखा विचारायचा, अंसही तो म्हणाला.
CSK vs RCB Live: MS Dhoni, तुझं हे वागणं बरोबर नाही! चेपॉकवर जे घडलं ते अनेकांना अपेक्षित नव्हतं, Irfan Pathan म्हणाला... कोणत्या खेळाडूचं नाव घेतलं?यावेळी बोलताना इरफानने त्या खेळाडूचं नाव घेतलं नाही. ''आता त्या खेळाडूचं नाव घेऊन मला कुणाला अपमान करायचा नाही. आता नाव घेण्यात काही अर्थही नाही. खरं तर क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो'', असं त्याने सांगितलं.
या खेळाडूंबाबत दिलं स्पष्टीकरण...महत्त्वाचे म्हणजे हा वरिष्ठ खेळाडू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण यापैकी कोणीही नव्हता. मुळात सौरव गांगुली सारख्या खेळाडूंनी तर इतरांसाठी स्वत:चा फलंदाजी क्रमांक सोडला", असंही इरफान पठाणने स्पष्ट केलं.
सरळ सरळ विराटचं नाव घे ना, उगाच...! नेटिझन्सच्या पोस्टवर Irfan Pathan चं उत्तर; क्रिकेटपटू असं काय म्हणाला? इरफानची क्रिकेट कारकीर्ददरम्यान, इरफान पठानने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत त्याने कसोटी सामन्यात १ हजार १०५, एकदिवसीय सामन्यात १ हजार ५४४ आणि टी-२० मध्ये १७२ धावा केल्या आहेत. याशिवाय इरफानने कसोटीत एक शतक आणि सहा अर्धशतकं आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच अर्धशतकं झळकावली आहेत.