Maharashtra Live Updates : वाळवा तालुका हा सहजासहजी वाकत नाही, कोणाला शरण जात नाही : जयंत पाटील यांचे सूचक विधान
Sarkarnama August 17, 2025 12:45 AM
Jayant Patil : वाळवा तालुका हा सहजासहजी वाकत नाही, कोणाला शरण जात नाही : जयंत पाटील यांचे सूचक विधान

वाळवा तालुक्यातील एखादा विद्यार्थी खंडपीठाच्या न्यायाधीशपदी बसेल, असं आपलं स्वप्न आहे. वाळवा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे. या स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटीशांशी लढताना कधी माघार घेतली नाही. लढाई करायची तर शेवटपर्यंत निकाराने करायची, हा या तालुक्याचा आदर्श आहे. आमच्या तालुक्याचा हा प्राब्लेमही आहे. सहजासहजी हा तालुका वाकत नाही, शरण जात नाही. लढाई करायची असेल तर कितीही फंदफितूरी झाली तरी सोबत असणाऱ्यांना घेऊन लढायचं, हे एनडी पाटील यांच्यापासून सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी आम्हाला शिकवले आहे, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

Saroj Patil : आमचा अजित वरून नारळासारखा कठोर वाटतो; पण आतून गोड पाण्यासारखा आहे : सरोज पाटील

आमचा अजित वरून नारळासारखा कठोर वाटतो. पण फार प्रेमळ आहे. नारळाचं पाणी जसं आतून गोड असतं. तसा तो आहे. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. पण आज जरा घाई करू नका बाबा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांच्या आत्या सरोज पाटील यांनी जाहीररित्या कौतुक केले.

Padmakar Valvi : नंदूरबारमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आज बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. वसंत पुरके उपस्थित होते. वळवी यांचे मी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. लवकरच नंदूरबार येथे मोठा कार्यक्रम करून त्यांच्या सहकाऱ्यांनाही काँग्रेस पक्षात औपचारिक प्रवेश देण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Pune News : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण परिसरातील अतिक्रमणे एक सप्टेंबरपासून काढणार

पुणे-नाशिक महामार्ग, चाकण औद्योगिक वसाहतीचा परिसर तसेच चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या मार्गांवरील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी केली. या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन मार्ग होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या मार्गालगतची अतिक्रमणे पीएमआरडीए, चाकण नगरपरिषद आणि संबंधित विभाग संयुक्त कारवाई करून काढून टाकणार आहे. ही कारवाई साधारणपणे १ सप्टेंबरपासून सुरू होईल, असे ‘पीएमआरडीए’ चे आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितले.

Keshav Upadhye : फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्यांना आता घरी पाठवूया, भाजपने ठाकरेंना डिवचलं

आज देशभरात दहीहंडी जल्लोषात साजरी केली जात आहे. अनेक राजकारण्यांनी देखील दहीहंडीचं आयोजन केलं आहे. अशातच आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लावला आहे. दहीहंडीचा उत्सव साजरा करूया, पण फक्त हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना आता घरी पाठवूया, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. गोपाळ काल्याच्या शुभेच्छा देताना त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं की, दहीहंडी जल्लोषात साजरी करूया पण फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्याना आता घरी पाठवूया मुंबई महापालिकेची हंडी वर्षानुवर्षे उबाठावाले फोडत आले. खालच्या थराला सामान्य मुंबईकर पिचत होता. मुंबईकर कर भरत हंडी भरायचा.

त्यांच्या अंगाखांद्यावर चढलेला कृष्णाचं सोंग घेतलेला पेंद्या मात्र महापालिकेच्या हंडीतील रस्ते, नालेसफाई, पाणी आणि खड्ड्यांच्या कंत्राटातूनही अलगद लोण्याचा मलिदा काढून ओरपायचा आणि मुंबईकरांच्या माथ्यावर हंडीची खापरं फोडायचा… ही फुटकी खापरं घरात ठेवून वर्षानुवर्षे मुंबईकराने समृद्धीची स्वप्ने पाहिली, पण या समृद्धीने कधी कलानगराचा उंबरठा ओलांडलाच नाही. आता नव्या हंडीला यांची सलामी पण नकोशी झाली आहे. अटलसेतू, कोस्टल रोड, मेट्रो, बीडीडी वासीयांना नवी घरे व सुरक्षेच्या हमीसोबत विकासाची हंडी फोडून समाधानाचे लोणी थेट जनतेला वाटणारे देणारे नेतृत्व राज्यात देवेंद्रजीच्या रूपाने आहे. कृष्णाचं सोंग घेऊन कंसाच काम करणाऱ्यांना आता कायमचं घरी बसवूया, सकाळी भोंग्याची बांग देणाऱ्या पुतना मावशीला तिची जागा दाखवूया, आणि संकटात गोवर्धन धरणाऱ्या कृष्णाप्रमाणेच मुंबईकरांची काळजी घेणाऱ्या देवेंद्रजीना साथ देऊया… गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा फक्त हंडीतील लोण्यावरच लक्ष ठेवणाऱ्याना आता घरी पाठवूया, भाजपने ठाकरेंना डिवचलं

हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया - केशव उपाध्य

मुंबईच्या समुद्धीने कलानगरचा रस्ता कधी ओलांडलाच नाही. केवळ हंडीतील लोण्यावर लक्ष ठेवणाऱ्यांना घरी पाठवूया भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरेंना टोला.

Mumbai News : गोरेगावमधील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने 23 व्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं

मुंबईतील गोरेगाव परिसरात एका प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने इमारतीच्या 23 व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्य केली आहे. 14 ऑगस्टला दुपारी आई-वडील घराबाहेर गेले असताना तिने हे टोकाचं पाऊल उचललं. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या ओबेरॉय स्क्वायर या इमारतीमध्ये ती राहत होती.

Pune Crime : पुण्यात मद्यधुंद कार चालकाची डिसीपीच्या गाडीला धडक

पुण्यातील मद्यधुंद कार चालकाने डिसीपीच्या गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशवनगर भागात रात्री साडे दहा वाजता ही घटना घडली. वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिल्या प्रकरणी दोन आरोपींना मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sharad Pawar: शरद पवार आज पुण्यात, विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार

जेष्ठ नेते शरद पवार पुण्यात असून त्यांनी सकाळपासून भेटीगाठी सुरू केल्या आहेत. साखर संकुलातील भेटीनंतर ते दुपारी 3 वाजता किशोर पवार यांच्या स्मृतीदीन कार्यक्रमासाठी  एस एम जोशी सभागृहात उपस्थितीत राहणार आहेत. तर तर सायंकाळी 5 वाजता काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमसाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे उपस्थितीत राहणार आहेत.

Ajit Pawar : आपापला पक्ष वाढवण्यात काहीही गैर नाही - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महायुतीतले सर्वच आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असू त्यामध्ये काहीही गैर नाही असं म्हटलं आहे. शिवाय विरोधक देखील आपापल्या परीने पक्ष वाढवतात. त्यामुळेच मी आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तर 25 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यातील देखील कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Mumbai Rain : मुंबईत पावसामुळे प्रवाशांचे हाल, मोठी वाहतूक कोंडी

मुंबईसह रायगडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे आज सकाळपासून मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सरासरी अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी रुळावर साचल्याने प्रवाशांना स्थानकांवर तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवाय शहरातील रस्त्यांनाही नद्यांचे स्वरूप आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Rain Alert : मुंबईसह रायगडला पावसाचा रेड अलर्ट

मुंबईसह रायगडमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज शनिवारी (ता.16) मुंबई, ठाणे, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Mumbai Rain Landslide : मुंबईत मुसळधार पाऊसामुळे दरड कोसळली, दोघांचा मृत्यू

मुंबईत आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असून रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पूर्व उपनगरातील विक्रोळी परिसरात आज पहाटे दरड कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंच्या जावयाच्या अडचणी वाढल्या, सायबर पोलिसांत महिलेकडून तक्रार दाखल

खराडी पार्टी प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने 2022 ते जून 2025 या काळात खेवलकरने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून त्यांचे निर्वस्त्र फोटो संमती नसताना काढल्याचा आणि या फोटोंचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे, अशी फिर्याद महिलेने सायबर पोलिसांत दिली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.