HDFC बँकेचे नवे नियम लागू; बदललेल्या नियमांचा थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम
Sarkarnama August 17, 2025 07:45 AM
HDFC ग्राहकांच्या खिशावर परिणाम

एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक आहे. बँकेने सर्व्हिस चार्जिंग पॉलिसीत मोठे बदल केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम लाखो ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

HDFC नवीन नियमांचा उद्देश

बँकेचा दावा – दर्जेदार सेवा व ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे प्रत्यक्षात – रोख व्यवहार, चेकबुक आणि ट्रान्सफर महाग होणार.

HDFC कॅश ट्रान्झॅक्शनची नवी मर्यादा

पूर्वी: 2 लाख रुपये प्रति महिना मोफत कॅश ट्रान्झॅक्शनकॅश ट्रान्झॅक्शन करता येत होतं. आता फक्त 1 लाख रुपयेपर्यंत मोफत. मर्यादा ओलांडल्यास: प्रत्येक 1000 मागे 5 अशी मर्यादा आखण्यात आली आहे.

HDFC फ्री ट्रान्झॅक्शनवर मर्यादा

महिन्यात फक्त 4 फ्री कॅश डिपॉझिट आणि विड्रॉ करता येणार. 5व्या व्यवहारापासून प्रत्येकासाठी 150 रूपये शुल्क लागणार. थर्ड पार्टी व्यवहारासाठी फक्त 25,000 पर्यंतची मर्यादा आखण्यात आली आहे.

HDFC IMPS ट्रान्सफरमध्ये बदल

1,000 पर्यंत: सामान्य ग्राहकांसाठी 2.5 रुपये तर वरिष्ठ नागरिक – 2.25 रुपये शुल्क आकारण्यात येणार. 1 लाखांवरील ट्रान्सफर पूर्वी 15 रुपये शुल्क आकारण्यात येत होता आता 13.5 रुपये लागणार.

HDFC चेकबुक महागले

पूर्वी: वर्षाला 25 पानांचे मोफत चेकबुक मिळायचे आता फक्त 10 पाने मोफत. त्यानंतर प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठी थोडी सूट देण्यात आली आहे.

HDFC शुल्क टाळण्यासाठी काय कराल?

शुल्क टाळण्यासाठी शक्यतो डिजिटल ट्रान्सफर (IMPS, NEFT) ऑनलाईन करा. छोट्या व्यवहारांसाठी UPI/QR कोड वापरा – पूर्णपणे मोफत. थर्ड पार्टी कॅश ट्रान्सफर टाळा. चेकबुक वापरण्याऐवजी डिजिटल पर्याय निवडा.

Bank अतिरिक्त शुल्क टाळता येईल

बँकेचे नियम ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रवृत्त करणारे आहेत. वरिष्ठ नागरिकांसाठी काही सवलती ठेवल्या असल्या तरी बहुतेक ग्राहकांवर आर्थिक ताण वाढणार आहे. योग्य नियोजन व डिजिटल वापर केल्यास अतिरिक्त शुल्क टाळता येईल.

Next : फक्त एक पास अन् 12 महिने टोलफ्री प्रवास; 'या' जिल्ह्यांना होणार मोठा फायदा! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.