-rat१६p१८.jpg-
२५N८४७२९
पावस ः मेर्वी शाळेत दहीहंडी फोडताना विद्यार्थी.
(सुधीर विश्वासराव ः सकाळ छायाचित्रसेवा)
------
‘मेर्वी’त विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १६ ः रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी प्राथमिक शाळेत शनिवारी (ता. १६) गोपाळकाला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी गोविंदा रे गोपाळा असे म्हणत टाळमृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. या वेळी मुख्याध्यापिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, आनंद सावंत, संजया पावसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश म्हादये, सिद्धार्थ पावसकर, पियुष बेंद्रे, विघ्नेश गोठणकर, निहार म्हादये, चित्रा हातणकर आदी उपस्थित होते. गोपाळकाला उपक्रमांतर्गत श्रीकृष्णाची भूमिका ओम चंदूरकर आणि राधाची भूमिका सानवी कुरतडकर यांनी केली होती.