मोठी बातमी! एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर, महाराष्ट्रासोबत आहे खास कनेक्शन
GH News August 17, 2025 11:13 PM

मोठी बातमी समोर येत आहे, एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी अखेर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डांकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सी.पी.राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. सी.पी.राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. सी. पी. राधाकृष्णन हे मुळ तामिळनाडूचे आहेत. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या निवडीवर प्रदीर्घ चर्चा झाली, त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं की, भाजपच्या संसदीय मंडळाकडून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करण्यात आला आहे, आम्हाला सर्वांच्या सम्मतीने उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निश्चित करायचा होता.एनडीएकडून सी. पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत, सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

कोइम्बतूरमधून दोन वेळा खासदार

चन्द्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन म्हणजेच सी.पी. राधाकृष्णन हे 1998 आणि 1999 असे दोनदा कोइम्बतूरमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडू येथील तिरुप्पुरमध्ये झाला. ते भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. 31 जुलै 2024 ला त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्विकारला होता, यापूर्वी ते काही काळ झारखंडचे देखील राज्यपाल होते. 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलाई 2024 या काळात ते झारखंडचे राज्यपाल होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.