Siddheshwar Dam: मुसळधार पावसामुळे येलदरी भरले; सिद्धेश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडून ६५०० क्युसेस विसर्ग
esakal August 17, 2025 08:45 PM

हिंगोली : येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण भरले असून या धरणाचे आठ दरवाजे ०.३ मीटरने रविवार (ता.१७ ) रोजी सकाळी दहा वाजता उघडण्यात आले आहेत.

येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने येलदरी धरण भरले आहे यामुळे धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे यामुळे त्याखाली असलेल्या सिद्धेश्वर धरण देखील भरले असून ८८.२२ % पाणीसाठा उपलब्ध झाला आहे अजूनही पाण्याची पाण्याची आवक वाढली आहे.

यामुळे ता.१६ रोजी धरणाचे दोन दरवाजे उघडून १६२१ क्युसेस पाणी पूर्ण नदीपात्रा सोडले जात होते.

India US Relations: भारत अमेरिका संबंध रसातळाला

आज रविवारी पुन्हा धरणाची इतर आठ दरवाजे उघडण्यात येऊन त्याद्वारे 6500 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे नदीकडच्या गावांनी सतर्क रहावे नदीपात्रात कुणीही जाऊ नये असे आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाने केले आहे. येलदरी,सिद्धेश्वर धरणावर औंढा वसमत या तालुक्यातील सिंचन अवलंबून आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.