Asia Cup 2025 : Eng टूर गाजवला पण आशिया कपसाठी टीम इंडियात त्या दोघांची निवड होणं कठीण, कसा असेल भारतीय संघ?
Tv9 Marathi August 18, 2025 05:45 PM

Asia Cup Squad Update : पाकिस्तानने आशिया कपसाठी आपल्या टीमची घोषणा केली आहे. आता सगळ्यांच्या नजरा भारतावर आहेत. आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा 19 ऑगस्टला होऊ शकते. टीम इंडियाच्या सिलेक्टर्सची मुंबईत बैठक होईल. त्या बैठकीत कुठल्या मुद्यांवर चर्चा होईल? कुठल्या खेळाडूंना संधी मिळेल? या बद्दल ठामपणे सांगता येणार नाही. पण शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज या दोघांची आशिया कपसाठी टीममध्ये निवड होण्याची शक्यता कमी आहे.

नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यातील शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज हे स्टार खेळाडू आहेत. पाच टेस्ट मॅचच्या सीरीजमधअये गिलने सर्वाधिक 750 धावा केल्या. तेच सिराजने मालिकेत सर्वाधिक 23 विकेट घेतले. पण आशिया कप टेस्ट प्रमाणे रेड बॉलने नाही, तर व्हाइट बॉलने खेळली जाणार आहे. ही मल्टीनॅशनल टुर्नामेंट T20 फॉर्मेटमध्ये होणार आहे. तुम्ही म्हणाल, शुबमन गिलने आयपीएलमध्ये इतक्या धावा केल्या. पण भारतीय सिलेक्टर्स अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सध्याच्या ओपनिंग जोडीशी छेडछाड करण्याच्या मूडमध्ये नाहीयत. क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार याच कारणांमुळे आशिया कपमध्ये गिल आणि सिराजची जागा बनण्याची शक्यता कमी आहे.

गौतम गंभीर यांच्या हातात काय आहे?

तिसरा ओपनर पण असू शकतो ना, शुबमन गिलला मग का संधी देणार नाही?. रिपोर्ट्नुसार यशस्वी जैस्वाल त्यासाठी मोठा दावेदार आहे. बरच काही टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर अवलंबून आहे. शुबमन गिलवर गंभीर यांनी विश्वास दाखवला, तर भारताच्या टेस्ट कॅप्टनला T20 टीममध्ये संधी मिळू शकते.

श्रेयस अय्यरची निवड होण कठीण का?

रिपोर्टनुसार, ओपनिंग नंतर पुढच्या क्रमवारीत तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह या खेळाडूंची नाव आहेत. जितेश शर्माला दुसरा विकेटकीपर म्हणून निवडलं जाऊ शकतं. टीममध्ये एक्स्ट्रा फलंदाज म्हणून श्रेयस अय्यरची निवड होऊ शकते. त्याने फिटनेस टेस्ट सुद्धा पास केलीय. पण भारतीय थिंक टँकने फक्त फलंदाजाऐवजी, जो गोलंदाजीही करु शकतो अशा खेळाडूचा विचार केला, तर श्रेयस अय्यरला संधी मिळणं कठीण आहे. मग, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे प्रबळ दावेदार आहेत.

कुठल्या गोलंदाजांना संधी मिळेल?

हार्दिक पंड्याची निवड पक्की मानली जात आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात टीमची ताकद वाढवेल. त्या शिवाय जसप्रीत बुमराहच सुद्धा आशिया कपमध्ये खेळणं निश्चित मानलं जातय. जसप्रीत बुमराहसोबत अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा गोलंदाजीची धार वाढवतील. प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या दोघांपैकी एकाची निवड होऊ शकते. मोहम्मद शमीचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.