शुभम देशमुख
भंडारा : विवाह करण्यासाठी मुलामुलींची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर बालविवाह करण्यास कायद्याने गुन्हा आहे. असे असताना देखील बालविवाह केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव भंडारा जिल्ह्यात समोर आले आहे. रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेली असताना बालविवाह झाल्याचे बिंग फुटले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडाराजिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. बालविवाह करण्यात बंदी असून कायद्याने हा गुन्हा मानला जातो. असे असताना देखील वर आणि वधू १७ वर्षांचे असल्याची माहिती असतानाही दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचा विवाह लावून दिला. इतकेच नाही तर विवाहानंतर सदर मुलगी गर्भवती झाली होती. यामुळे आरोग्य तपासणीकरिता कुटुंबीयांनी मुलीला करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले.
Jalgaon Crime News : जळगाव पुन्हा हादरले; भररस्त्यात गाठून तरुणाची हत्यापाच जणांवर गुन्हा दाखल
याठिकाणी डॉक्टरांच्या तपासणीत मुलगी सात महिन्यांची गर्भवती असून ती केवळ १७ वर्षांची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी भंडाऱ्याच्या करडी पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन बालिका वधूच्या तक्रारीवरून पती, सासू - सासऱ्यांसह पीडितेच्या आई- वडील अशा पाच जणांवर बालविवाहप्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून पतीला अटक केली आहे.
Dharashiv : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; खरेदी केलेल्या सोयाबीनचे पैसे न देता व्यापारी पसारसंपूर्ण प्रकार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुका अंतर्गत येणाऱ्या दवनीवाडा पोलीस स्टेशन हद्दीत पीडित अल्पवयीन बालिकेची सासुरवाडी असल्याने करडी पोलिसांनी हा संपूर्ण तपास दोवणीवाडा पोलिसांकडे वर्ग केला आहे. यानंतर पोलिसांनी पिडीतेचे वडील प्रल्हाद शिवणकर, आई लता शिवणकर (वय ३५), सासरे प्रकाश शेंद्रे (वय ४०), सासू गीता शेंद्रे (वय ३५) व पती अक्षय (वय १७) यांना ताब्यात घेतले आहे.