-हेमंत पवार
कराड : कराड-पाटण तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी यामुळे कृष्णा कोयना नद्यांची पाणी पात्र बाहेर आले आहे. पाटण जवळील संगमनगर धक्का परिसरात पाणी रस्त्यावर आल्याने कराड चिपळूण मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्तत्यामुळे पाटणमध्ये कोकणात जाणारे सुमारे 150 प्रवासी काल रात्रीपासून अडकले होते. प्रशासनाने त्यांची एका महाविद्यालयात राहण्याची सोय केली होती. आज सकाळी प्रशासनाकडून एसटी बस मधून देवरुख मार्गे संबंधित प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी रवाना केले. कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्या असून ती एक लाख 21 हजार 700 क्युसेक होत आहे. कोयना धरणातील आज बुधवारी सकाळी आठ वाजताची पाणी पातळी 101.46 टी एम सी झाली आहे.
कोयना धरणातून काल रात्रीपासून 95 हजार 300 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे पावसाचे पाणी आणि कोयना धरणातून सोडण्यात आलेले मोठ्या प्रमाणात पाणी यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहून पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे संगमनगर धक्का परिसरात व हेळवाक येथे पूरस्थिती निर्माण होऊनरस्त्यावर पाणी आले आहे.
साेलापुरात राजकीय हस्तक्षेप नसेल तर तासात ‘डीजेमुक्त’ करू; पोलिसांची ग्वाही, आमदार, मंत्र्यांचा दबाव नकाेत्यामुळे तो मार्ग काल मंगळवारी दुपारपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. परिणामी संबंधित मार्गावरून कोकणात जाणारे प्रवासी पाटण येथे थांबवण्यात आले होते. त्यांची प्रशासनाने एका महाविद्यालयात तत्पुरती राहण्याची व्यवस्था केली होती. आज सकाळी देवरुख मार्गे संबंधित सुमारे 150 प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी एसटी बस मधून मार्गस्थ करण्यात आले.