सोलापूर: श्रीराम फायनान्समध्ये काम करतो से सांगून आम्ही नेहमीच नवीन, जुन्या कार जप्त करून आणतो. तुम्हाला स्वस्तात दोन महागड्या गाड्या देतो म्हणून कृष्णाल मुरलीधर बडोले (रा. सौदंड, जि. गोंदिया) याने १० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद अक्षय संजय गायकवाड (रा. शहा नगर, वांगी रोड) या तरुणाने फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे.
२१ जून ते ७ जुलै २०२५ या काळात वसंत विहारमधील भाड्याच्या खोलीत संशयित आरोपी अक्षय गायकवाड याने आम्हाला श्रीराम फायनान्सने जप्त केलेल्या गाड्या स्वस्तात देतो, असे आमिष दाखविले. फिर्यादी अक्षय व मित्र मयूर म्हेत्रे यांना निजामाबाद व हैदराबाद येथील कार्यालयात त्या गाड्या असल्याचे सांगितले. त्यासाठी ॲडव्हान्स द्यावे लागेल म्हणून एक लाख ३० हजार रुपये घेतले. त्यानंतर गाड्या पाहायला गेला तर माझे नाव सांगू नका, असेही सांगितले.
संशयित आरोपी कृष्णाल बडोले याने रोखीने, ऑनलाइन असे दहा लाख ८५ हजार रुपये घेतले. पण, त्याने ना गाड्या दिल्या ना पैसे परत दिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच अक्षय गायकवाड या तरुणाने पोलिस ठाणे गाठले. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.