पुणे : उपनगरांत गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसाच्या जोरामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
बाणेर बालेवाडी परिसरबाणेर-बालेवाडी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर
पाणी साचून वाहनांचा वेग मंदावला
पॅनकार्ड क्लब रस्ता, दत्त मंदिर चौक अशा अनेक
ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी
मिटकॉन चौक, साई चौक, एसकेपी कॅम्पसजवळचा
रस्ता परिसरात तळ्याचे स्वरूप
दुपारच्या सुमारास वाहतूक कोंडी झाल्याने विद्यार्थी,
नागरिक त्रस्त
रस्त्यावरील कोंडी सोडविण्यासाठी अनेकांचा प्रयत्न
वारजे भागात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय
सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी
अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहने
चालवणे कठीण
पादचाऱ्यांनाही रस्त्यांवरून चालणे मुश्कील झाले आहे.
संततधार पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यात
अडचणी येत आहेत
नवले पूल सेवा रस्त्यावर पाणी वाहत असल्याने
वाहतुकीवर परिणाम
सिंहगड रस्त्यावरील लगडमळा, धायरी परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांना अडचणी
पावसाचे पाणी वडगाव पुलाखाली साचत असल्याने कोंडी
धायरी फाटा उड्डाणपुलाजवळ अवजड
वाहतुकीमुळे खड्डे
सिंहगड रस्ता, धायरी भागात निचरा व्यवस्थेअभावी पाणी
तुंबून वाहनचालक व पादचारी हैराण
औंध, बोपोडी, पाषाण, सुतारवाडी, बाणेर रस्ता, सूस व महाळुंगे परिसरात सकाळपासूनच संततधार पावसामुळे अत्यावश्यक काम करणारे वगळता अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले
किरकोळ झाडपडीची घटना
औंध, बाणेर फाटा, ब्रेमेन चौक येथे पाणी साचल्याने वाहनचालकांची कसरत
औंधमध्ये पाणी साचून वाहतूक मंदावल्याने कोंडी
महाळुंग्यातील शेडगे वस्तीजवळ आणि बोपोडीत हॅरीस पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक संथ