सोलापूर: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली, तर सिद्धेश्वर एक्स्प्रेस मुंबईहून सुटण्याऐवजी पुण्यातून सोडण्यात आली. मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या उशिरा सुटल्यामुळे सोलापूरलाही उशिराने पोचत आहेत. यामुळे रेल्वे प्रवासी प्रचंड त्रस्त आहेत.
Satara Accident: दुर्दैवी घटना! 'वेळे, जोशी विहीर अपघातात दोघे ठार'; महामार्गावर दुचाकींची मालट्रकला धडक, पत्नीचा आक्रोशमुंबई व पुणे येथे सुरू असलेल्या पावसामुळे मंगळवारी (ता. १९) अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावल्या. मंगळवारी मुंबईकडे जाणारी उद्यान एक्स्प्रेस मुंबईपर्यंत पोचू शकली नाही. ही गाडी पुण्यातच उभी करावी लागली. याच गाडीचा रेक मुंबईहून सिद्धेश्वर एक्स्प्रेससाठी वापरला जात असल्यामुळे मंगळवारी सिद्धेश्वर एक्स्प्रेसही मुंबईऐवजी पुण्यातूनच सुटली. दरम्यान, मंगळवारी मुंबईतून सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने रद्द केली आहे. यामुळे सोलापुरातून बुधवारी सुटणारी वंदे भारतही रद्द झाली आहे.
अनेक एक्स्प्रेस गाड्या ३ ते ५ तास उशिरा सुटल्या. परिणामी, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून, प्रतीक्षालय व प्लॅटफॉर्मवर प्रवासी तासन्तास थांबलेले दिसून आले. मुले, महिला व वृद्ध नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मुंबई परिसरातील ट्रॅकवर पाणी साचणे, सिग्नलमध्ये बिघाड यामुळे गाड्या उशिरा सोडल्या जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. पुणे- मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. मुंबईहून सोलापूरला येणाऱ्या काही गाड्या मुंबईऐवजी पुण्यातून सुटणार असून, प्रवाशांना वेळापत्रकासाठी हेल्पलाइन वा रेल्वे अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिद्धेश्वर एक्स्प्रेसची स्थितीमुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही मुंबई येथून मंगळवारी रात्री १०.४० वाजता सुटणे अपेक्षित होते. त्याऐवजी पुणे स्टेशनहून रात्री २.२० वाजता सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने जाहीर केले.
कऱ्हाड हादरलं! 'महाविद्यालयीन युवतीचे अपहरण'; प्राचार्यांकडून तक्रार, युवती मैत्रिणींसोबत चालत निघाली अन्.. गाड्यांच्या वेळेतील बदलगाडीचे नाव मुंबईहून मंगळवारी बदलण्यात आलेली
सुटण्याची वेळ बुधवारची वेळ
मुंबई-सोलापूर वंदे भारत रद्द सायंकाळी ४.०५ रात्री १०.४०
मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस दुपारी २.१० सायंकाळी ६.१०
मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस दुपारी १२.४५ सायंकाळी ५
मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस दुपारी २ सायंकाळी ६
कुर्ला-विशाखापट्टणम सकाळी ६.५५ सकाळी ७.५
मुंबईतून न सुटता पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या
मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस
मुंबई-होसपेट एक्स्प्रेस
मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस