Pune Rain Update : पुण्यात पावसाचा कहर; रस्त्यांवर पाणी, वाहतूक कोंडी
esakal August 20, 2025 03:45 PM

पुणे : शहरात सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरासह उपनगरांत रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले. तसेच शहर व उपनगरांत विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.

त्यामुळे पीएमपीच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. पावसाच्या तडाख्याने पुणेकरांची चांगलीच दैना उडाली. दिवसभरात शहरात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारीही शहरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. पावसाच्या संततधारेमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता तसेच दिवसभर ढगाळ वातावरण होते.

शहरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला हलक्या सरींनंतर जोर वाढत जाऊन संततधार सुरू झाली ती सायंकाळीपर्यंत होती. त्यामुळे विविध रस्त्यांवर सखल भागांत पाणी साचलेले होते, तसेच पाणी वाहून जातानाही पाऊस असल्याने पाण्याची पातळी वाढली.

सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान नोकरदार कामासाठी घराबाहेर पडल्याने मुख्य रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनांची जागोजागी कोंडी झाली होती. यात जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता, फर्ग्युसन रस्ता, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता, टिळक रस्ता, शनिवार वाडा, कसबा पेठ, हडपसर, वाघोली या ठिकाणच्यापान १० वर

‘पीएमपी’चे वेळापत्रक विस्कळित

जोरदार पावसातच कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी घराबाहेर पडले. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी झाला. परिणामी सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा मोठा फटका पीएमपी बसला बसला. अनेक बस सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ कोंडीत अडकल्या. त्यामुळे पीएमपीच्या बसचे वेळापत्रक विस्कळित झाले. पुणे रेल्वेस्थानक, स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना रिक्षा मिळत नव्हत्या. अनेक रिक्षाचालक मनमानी भाडेआकारणी करत होते. नागरिकांना कॅबही मिळणे दुरापास्त झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.