सूर्यमालेत सूर्यापासून तिसरा ग्रह हा पृथ्वी आहे. तर चौथ्या स्थानावर लाल भडक असा मंगळ ग्रह आहे. पृथ्वीच्या अगदी बाजूला हा ग्रह आहे. त्यामुळे पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहावर जीवन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात संशोधक मंगळ ग्रहावरील जीवन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. खरंच तिथे मानवी वस्ती आहे का? की इतर सजीव राहतात असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासा गेल्या काही वर्षांपासून मंगळ ग्रहाचा अभ्यास करत आहे. यासाठी नासाने मंगळावर रोव्हर पाठवलं आहे. त्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. असं असताना नासाच्या रोव्हरने डायनासोरच्या अंड्यासारखी एक प्रतिकृती शोधली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंगळावर जीवन असावं असे संकेत या माध्यमातून पुन्हा एकदा मिळत आहेत. त्यामुळे संशोधनाला पुन्हा एकदा जोर चढला आहे.
रोव्हरने शोधलेली प्रतिकृती डायनासोरची अंडी नसलं तरी त्याच्या आकारामानामुळे कुतुहूल निर्माण झालं आहे. मंगळाच्या भूगर्भीय आणि संभाव्य जैविक इतिहासाबद्दल संशोधनाचा वेग वाढणार आहे. ही प्रतिकृती गुळगुळीत आणि गोलाकार आहे. त्यावरील काही रचना या दगडाइतक्या लहान आहेत. तर काही फुटबॉलसारख्या आहेत. पृथ्वीवर अशाच रचना ज्वालामुखी प्रक्रियेतून तयार होतात. या संरचनेत प्राचीन जीवनाच्या काही खुणा लपलेल्या असू शकतात.
मंगळावर पाठवलेलं क्युरिऑसिटी रोव्हर अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. आसपासच्या वस्तूंचं हाय रिझोल्यूशन फोटो घेते आणि लेझर स्पेक्ट्रोस्कोपीने त्याचं विश्लेषण करते. त्यामुळे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जर मंगळावरील प्राचीन जीवनशैलीचा शोध लागला तर तिथल्या अस्तित्वाबाबतच्या चर्चेला नवं रुप प्राप्त होईल. मंगळावरील वातावरण अत्यंत आव्हानात्मक आहे. तिथलं तापमान, धुळीचं वादळं आणि ओबडधोबड पृष्ठभाग अशा स्थितीत रोव्हरला कामं करणं कठीण आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने या सर्व संकटांवर मात केली असून शोध लावण्याचं काम सोपं केलं आहे.