Viral Video : भटक्या कुत्र्यांपेक्षा यांचाच राडा! पोलिसांपुढंच रिलस्टार महिलेनं केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणाले तुम्हाला लाज...
esakal August 22, 2025 09:45 PM

A woman danced in front of police officers to make a reel – video goes viral on social media : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार होतात. असाच काहीसा प्रकार नुकताच पुढे आला आहे. एका महिलेने चक्क पोलिसांसमोर रस्त्यावर डान्स करत रील बनवली आहे. या महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत संतापही व्यक्त केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला रिल्ससाठी थेट पोलिसांसमोर रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे , महिला डान्स करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ बघायची भूमिका घेतली आहे.

Viral Video : प्रेमात मिळाला धोका ! रागातच बायफ्रेंडच्या घरी पोहोचली तरुणी, तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली अन्... थरारक व्हिडिओ

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ एक्स या सोशल मीडियावर @Vtxt21 या खात्यावरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर एकाने लिहिलं की “हे किती अपमानजनक आहे. पोलीस आपली ड्युटी बजावत असताना कोणीतरी रील बनवण्यात मग्न आहे” तर अन्य एकाने लिहिलं की “पोलिसांनी आधी अशा कृत्य करणाऱ्यांना पकडलं पाहिजे”

Laxman Hake यांचे माळी समाजाबद्दल वाद वक्तव्य, बघा काय बोलून गेले? | video Viral | OBC | Politics

काहींनी हा पोलिसांचा अपमान असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी भटक्या कुत्र्यांना पडण्याऐवजी अशा रिल्सस्टारला पडका, असा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर काहींनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्याऐवजी पोलिसांनी केवळ बघायची भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे,असंही म्हणत नाराजी व्यक्त केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.