जुने नाशिक: घरफोडी गुन्ह्यात अल्पवयीन संशयितास ताब्यात घेण्यात आले असून, चौकशीत त्याच्याकडून २ लाख ५३ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. भद्रकाली गुन्हे शोध पथकाने अवघ्या ४८ तासात गुन्हा उघडकीस आणला. ट्रॅक्टर हाऊस परिसरात गुरुवारी (ता.२१) दिवसाढवळ्या घराची भिंत फोडून घरफोडी करण्यात आली होती. रात्री उशिरा भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाकडून तपास सुरू होता. पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने ४८ तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्यात अल्पवयीन संशयिताचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. शोध सुरू असताना शनिवारी (ता.२३) त्यास वडाळागाव परिसरातून ताब्यात घेतले.
Nashik News : ३२१ कोटींच्या निधी वाटपावरून राजकारण तापले; लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांकडे धावचौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख ५३ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सिराज शेख करीत आहेत. वरिष्ठ निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार, नरेंद्र जाधव, संदीप शेळके, संतोष काकड, सतीश साळुंके, कय्यूम सय्यद, अविनाश जुंद्रे, प्रभाकर आहेर, धनंजय हासे, जितेंद्र पवार, जावेद शेख, तौसिफ सय्यद, नारायण गवळी, नीलेश विखे, अविनाश थेटे, गुरूदादा गांगुर्डे यांनी गुन्ह्याची उकल केली.