मध्यरात्री घरात घुसले अन् प्राणघातक हल्ला; उपमुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षातील कामगारासोबत भयंकर घडलं
Saam TV August 22, 2025 09:45 PM
  • विलास मस्के यांच्यावर मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून हल्ला केला.

  • धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात मस्के गंभीर जखमी झाले असून त्यांच्या बहिणीवरही वार झाला.

  • मस्के हे गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षात काम करत होते.

  • अद्याप गुन्हा दाखल झालेला नसला तरी पोलिस तपास करत आहेत आणि गावात खळबळ उडाली आहे.

बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्यावर पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी पालवन येथील त्यांच्या घरी हल्ला केला आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात विलास मस्केगंभीर जखमी झाले असून, त्यांची बहिण भाग्यश्री सोजे यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी विलास मस्के यांच्या पालवन येथील घरी पाच ते सहा जण अज्ञात हल्लेखोर घुसले. त्यांनी घुसून हल्ला केला. यात मस्के यांच्या बहिणीवरही हल्ला झाला आहे.

अतिभारामुळे मोनोरेल पुन्हा झुकली; आचार्य अत्रे स्थानकाजवळ थांबली, ५० प्रवाशांना उतरवलं | VIDEO

मस्के हे गेल्या तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांच्यासोबत बीड वैद्यकीय मदत कक्षाचे काम पाहत होते. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, धारदार शस्त्राचे वार गंभीर स्वरूपाचे असून मस्के यांच्यावर बीड शहरातील गिताई हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

२ मैत्रिणींचा एकाच बॉयफ्रेंडवरून वाद; महिला होमगार्डला मैत्रिणीनेच संपवलं, बीडमध्ये लव्ह ट्रायंगलचा 'असा' शेवट

या घटनेत अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, कारण विलास मस्के हे बोलण्याच्या स्थितीत नाहीत. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे. या घटनेनंतर बीड पुन्हा हादरले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.