आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजार सुस्त; सेंसेक्स 300 अंकांपर्यंत खाली आला तर निफ्टी 25,000 च्या खाली सरकला.
ग्लोबल मार्केट्समध्ये दबाव कायम; डाओ-नॅस्डॅक लाल रंगात, पण भारताचा सर्व्हिस PMI 65.6 च्या रेकॉर्ड पातळीवर.
DIIs ने सलग 33व्या दिवशी खरेदी केली; कॉर्पोरेट मोर्चावर विप्रो-हार्मन डील आणि अपोलो हॉस्पिटल्स ब्लॉक डील चर्चेत.
Stock Market Opening Today: आज आठवड्याच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजाराची सुस्त सुरुवात झाली. सुरुवातीला सेंसेक्स 49 अंकांनी घसरून 81,951 वर उघडला, तर निफ्टी 19 अंकांनी घसरून 25,064 वर सुरु झाला. बँक निफ्टीदेखील 199 अंकांनी घसरून 55,556 वर उघडला.
यानंतर बाजारातील घसरण वाढली. सेंसेक्स जवळपास 300 अंकांनी खाली आला, निफ्टीही 90 अंकांनी घसरून 25,000 च्या खाली गेला. NBFC, मेटल, रिअल्टी आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये सर्वाधिक दबाव दिसला, तर मीडिया, फार्मा आणि कंझ्युमर ड्यूरेबल्समध्ये हलकी वाढ झाली.
ग्लोबल मार्केट्सचा दबावगिफ्ट निफ्टी सकाळी 81 अंकांनी घसरला होता, नंतर थोडीशी रिकव्हरी झाली. जागतिक पातळीवर दबाव कायम राहिला. जॅक्सन होल येथे फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या भाषणाआधी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले. डाऊ जोन्स 150 अंकांनी कोसळला, तर नॅस्डॅक 70 अंकांनी खाली गेला आणि सलग तिसऱ्या दिवशी घसरला. मात्र, डाऊ फ्यूचर्स 50 अंकांनी वर होते, तर जपानचा निक्केई हलक्या वाढीसह व्यवहार करत होता.
Job Growth: नोकरीचं टेन्शन संपलं! 2030 पर्यंत या क्षेत्रात 2.5 लाख नोकऱ्या निर्माण होणार भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमीभारतासाठी सकारात्मक बातमी आहे. ऑगस्ट महिन्यात देशाचा प्रायव्हेट सेक्टर ग्रोथ रेकॉर्ड पातळीवर पोहोचला. नवीन ऑर्डर्समुळे सर्व्हिस सेक्टरचा PMI 65.6 वर गेला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
आजचे महत्त्वाचे ट्रिगर्सडाऊ 152 अंक, नॅस्डॅक 72 अंकांनी घसरले
क्रूड 67 डॉलर प्रति बॅरलच्या वर; सोने स्थिर
FIIs ची ₹1,233 कोटींची खरेदी, DIIs सलग 33व्या दिवशी खरेदी
भारताचा सर्व्हिस PMI 65.6 वर रेकॉर्ड हाय
अपोलो हॉस्पिटल्समध्ये ₹1,400 कोटींच्या ब्लॉक डीलची शक्यता
विप्रो सॅमसंगच्या Harman कंपनीचाDTS बिझनेस खरेदी करणार
कमोडिटी मार्केटमध्ये कच्चे तेल 1% वाढून $67 प्रति बॅरलच्या वर पोहोचले. सोने सध्या $3,380 प्रति औंसवर स्थिर आहे. चांदीत 1% वाढ झाली आहे तर देशांतर्गत बाजारात चांदी ₹1,13,700 प्रति किलोच्या वर बंद झाली.
राजकीय घडामोडीभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार वाढवणे आणि रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यावर भर दिला.
फंड फ्लोदेशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग 33व्या दिवशी खरेदी कायम ठेवली. काल त्यांनी ₹2,500 कोटींची खरेदी केली. तर परदेशी गुंतवणूकदारांनी(FIIs) कॅश, इंडेक्स व स्टॉक फ्युचर्समध्ये एकत्रितपणे ₹1,233 कोटींची खरेदी केली.
कॉर्पोरेट अपडेटविप्रो ने सॅमसंगच्या Harman कंपनीच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्यूशन्स बिझनेसची खरेदी जाहीर केली. ही डील सुमारे ₹3,300 कोटींमध्ये झाली असून, 100% हिस्सा विकत घेतला जाणार आहे.
अपोलो हॉस्पिटल्स मध्ये आज जवळपास ₹1,400 कोटींची ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. प्रोमोटर्स सुमारे 1.25% हिस्सा ₹7,747 फ्लोअर प्राइसवर विकणार आहेत.
1. आज बाजारात सर्वात मोठा दबाव कुठल्या इंडेक्समध्ये दिसला?
- NBFC, मेटल, रिअल्टी आणि प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये सर्वाधिक घसरण दिसली.
Which sectors saw the biggest pressure today?
- NBFC, Metals, Realty, and Private Banks were the worst hit.
2. भारतासाठी चांगली आर्थिक बातमी कोणती आहे?
- ऑगस्ट महिन्यात देशाचा सर्व्हिस PMI 65.6 वर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक स्तर आहे.
What was the positive economic news for India?
- India’s Services PMI surged to a record high of 65.6 in August.
3. परदेशी (FIIs) आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) काय भूमिका घेतली?
- FIIs नी ₹1,233 कोटींची खरेदी केली, तर DIIs नी सलग 33व्या दिवशी ₹2,500 कोटींची खरेदी केली.
How did FIIs and DIIs trade today?
- FIIs bought ₹1,233 Cr, while DIIs continued buying for the 33rd straight day with ₹2,500 Cr.
4. कोणत्या कंपन्यांच्या डील्स आज चर्चेत?
- विप्रोची हार्मन बिझनेस खरेदी (₹3,300 कोटी) आणि अपोलो हॉस्पिटल्समध्ये ₹1,400 कोटींची ब्लॉक डील.
Which corporate deals made headlines today?
- Wipro’s acquisition of Harman’s DTS business (~₹3,300 Cr) and Apollo Hospitals’ ₹1,400 Cr block deal.