रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Shubhanshu Shukla Live Update: आर्यभट्ट गॅलरीचे उद्घाटन ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केलेराष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मुंबईतील नेहरू तारांगणात आर्यभट्ट गॅलरीचे उद्घाटन करण्यात आले. या गॅलरीचे उद्घाटन ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने उपस्थित पाहुण्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमा, उपग्रह प्रक्षेपण आणि वैज्ञानिक कामगिरी यांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाबद्दल माहिती मिळावी यासाठी खास प्रदर्शनही भरविण्यात आले.
Kolhapur Live Update: कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठकघडलेला प्रकार निंदनीय, काही तरुणांकडून झालेली गोष्ट निंदनीय
दोन्ही समाजाकडून दिलगिरी व्यक्त
घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून सीसीटीव्हीची पाहणी
दंगल घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर होणार कडक कारवाई
अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांची माहिती
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्कलकुवा आणि अक्राणी परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस. सततच्या पावसामुळे शेती पिक खराब होण्याची शक्यता. पावसामुळे जिल्ह्यातील धरणांचा पाणी साठत देखील वाढ होणार आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारली होती मात्र गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे शेती पिकांना जीवदान मिळणार असून जिल्ह्याच्या पाणी पातळीत देखील वाढ होणार आहे.
LiveUpdate: अनसिंग येथे हवामान केंद्राच्या बोगस पावसाच्या नोंदींवर संताप...वाशिमच्या अनसिंग येथील स्वयंचलित (AWS) हवामान केंद्रातील पाणी मोजमाप यंत्र लीक असून वायरिंग जळालेली आहे, त्यामुळे खोटी पावसाची नोंद होत आहे.ज्या दिवशी मुसळधार पाऊस झाला त्या दिवशी केंद्राने कमी पाऊस दाखवला, तर अनेक वेळा जोरदार पावसाच्या दिवशी "NIL" पाऊस नोंदवला.
या चुकीच्या नोंदींवर आधारित पंचनामे तयार झाल्याने अनसिंग मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्याचा आरोप करत अनसिंग येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज घोषणा बाजी करत पावसाच्या मोजमापाच्या बोगस अहवालांची होळी करून निषेध केला आहे.
Liveupdate: शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजरशिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर आज नगरपरिषदेने बुलडोजर फिरवत कारवाई केली. टपऱ्या, बंद टपऱ्या, हातगाड्या, दुकानदारांची बाहेर काढलेली शेड, बोर्ड, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.गेल्या महिन्यापासून प्रलंबित असलेली ही कारवाई अनेक दुकानदारांना पूर्वसूचना व नोटिसा देऊनच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचे म्हणणे ऐकून, पाहणी करून व अतिक्रमणधारकांना पूर्वीच ती काढून टाकण्याची विनंती करूनही कारवाई न झाल्याने अखेर आज बुलडोजर फिरविण्यात आला. यापुढे शहरात अतिक्रमण होऊ नये, यासाठी नगरपरिषद सज्ज राहणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
Mumbai Live : जोगेश्वरी परिसरात इमारतीला आगमुंबईचा जोगेश्वरी परिसरात इमारतीच्या तळमजल्याला आग
जोगेश्वरीतील लालानी हेरिटेज पार्क इमारतीच्या तळमजल्यावर महापालिकेच्या माध्यमातून पार्किंग सुरू
पे अँड पार्किंग मध्येच आग लागल्यामुळे रहिवाशांचा उडाला गोंधळ
त्याच ठिकाणी काही वाहनांची देखील इलेक्ट्रिक चार्जिंग सुरू असताना लागली आग
मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
सध्या पुल्लिंग ऑपरेशनचे काम सुरू
आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजले नाही
Nagpur Live : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात झाली आहे. जवळपास १४४ वर्षांची ही परंपरा आहे. मक्कासाथ परिसरातून या उत्सवाला सुरुवात झाली आहे.
Mumbai Live : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
Mumbai Live : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी० मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुरु
० माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा
० गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत
० चाकरमान्यांच्या कोकणच्या वाटेवर वाहतूक कोंडीचे विघ्न
० माणगावमधील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या
NewYork Bus Accident : न्यूयॉर्कमध्ये ५० प्रवाशांच्या बसचा अपघात, ५ जणांचा मृत्यून्यूयॉर्कमध्ये ५० प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसचा भीषण अपघात. पाच जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. प्रवाशांमध्ये भारत, चीनसह आशियाई देशातील नागरिकांचा समावेश आहे.
Nashik News Live : कालव्याचं काम ४५ वर्षांपासून सुरू, ग्रामस्थांकडून आमरण उपोषणतळवाडे-भामेर ग्रामस्थांचे तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असून तब्येत खराब असतानाही आंदोलनावर ठाम आहेत. हरणबारी ते तळवाडे-भामेर कालव्याचे काम गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायम आहे. कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचं म्हणत मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी म्हटलंय.
Malad News Live : महापालिका शाळेच्या खासगीकरणाचा घाट, काँग्रेस आक्रमकमहापालिका शाळेच्या खाजगीकरण विरोधात काँग्रेस आक्रमक झाले आहे. मालाड मालवणीतील महापालिका पब्लिक स्कूल प्रशासनाने खाजगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं गेलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवले. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून निवेदन देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Amit Thackeray Ashish Shelar : अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेटभाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीचं कारणही अमित ठाकरे यांनी सांगितलंय. आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे खासगी शाळांमधील परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी केलीय.
Nashik live: नाशिकमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी! चॉपर-हॉकी स्टिकने धुमश्चक्री, दोन जण गंभीरनाशिकच्या नांदूर नाका परिसरात किरकोळ वादातून दोन गटात फ्रीस्टाइल हाणामारी झाली असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पायावरून दुचाकी गेल्याच्या कारणावरून भाजपचे उद्धव निमसे आणि धोत्रे गटामध्ये वाद पेटला आणि दोन्ही गटातील १५ ते २० जण आमने-सामने आले. या हाणामारीत चॉपर, चाकू आणि हॉकी स्टिकचा सर्रास वापर करण्यात आला. यात धोत्रे गटातील राहुल धोत्रे आणि अजय गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हाणामारीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी दोन्ही गटाकडून आडगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विदर्भाचा अभिमान! नागपूरमध्ये मारबत उत्सवाला सुरुवात, काळ्या-पिवळ्या मारबतींच्या भेटीची उत्सुकतानागपूरमध्ये विदर्भाचं सांस्कृतिक वैभव मानल्या जाणाऱ्या मारबत उत्सवाला सुरुवात झाली आहे. या अनोख्या परंपरेत काळी आणि पिवळी मारबत एकमेकांना भेटतात, हा क्षणच उत्सवाचा सर्वात मोठा आकर्षणबिंदू असतो. यंदा नेहरू चौकाऐवजी साधारण ५० मीटर पुढे ही भेट होणार असून, हजारो नागरिक या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक आहेत. "ईडा पिडा घेवून जा गो मारबत" अशा घोषणांच्या गजरात दोन्ही मारबतींच्या भेटीनंतर त्यांच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात होते. 'मारबत आणि बडग्या' हा जगातला एकमेव असा अनोखा मिरवणुकीचा प्रकार फक्त विदर्भात पाहायला मिळतो.
Nashik Live: खड्ड्यांनी ठप्प वाहतूक! करंजाळी घाटात बससह चार वाहने अडकलीनाशिक-पेठ महामार्गावरील करंजाळी घाटात खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून प्रवाशांना मध्यरात्री मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुरतहून नाशिककडे येणारी स्लीपर कोच बस मोठ्या खड्ड्यात फसल्याने प्रवासी रात्रीभर अडकले. पहाटे दुसऱ्या गाडीने त्यांना नाशिककडे रवाना करण्यात आले. याच महामार्गावर खड्ड्यांमुळे आणखी तीन वाहने वेगवेगळ्या ठिकाणी अडकली, त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली.
kolhapur live: कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतताकोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात काल दोन गटांमध्ये दंगल उसळली असून या गोंधळात अनेक वाहनांची तोडफोड झाली. फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त परिसरात भव्य बॅनरबाजी, लाइटिंग आणि डॉल्बी लावण्यात आली होती. यामुळे नागरिकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आणि वादाची ठिणगी पेटली. पुढे हा वाद मोठ्या दंगलीत परिवर्तित झाला. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.
Veerendra Puppy Raid : चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांना ‘ईडी’कडून अटकबंगळूर : चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना करचुकवेगिरी आणि गेमिंग ॲपद्वारे बेकायदा मालमत्ता संपादन केल्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली. सिक्कीमच्या दौऱ्यावर असलेल्या पप्पी यांना कोलकाता येथे अटक करून बंगळूरला आणले आहे.
Nagpur News : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणारनागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार आहे. ही मिरवणूक केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक देखील मानली जाते. काळी पिवळी मारबत मिरवणुकीत अनेक सामाजिक संदेश देणारे बडगे देखील काढले जाते. पिवळी मारबतीला देवीचे रूप म्हणून पुजले जाते, तर काळी मारबत ही दुर्जनाचे प्रतीक असल्याची मान्यता आहे. समाजातील वाईट रूढी, प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धेच दहन करून चांगल्या परंपरा आणि विचाराचा स्वागत करणे हा या उत्सवाच उद्देश आहे. भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांसोबत हात मिळवणी केली होती. त्या विरोधात काळी मारबत काढली जाते. त्या काळ्या मराबतीला 144 वर्ष झाले आहे. तर, पिवळी मारबतला 141 वर्षाची परंपरा आहे.
Gangapur Dam : गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद; गोदावरीचा पूर देखील ओसरलानाशिक
- गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद
- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने गंगापूर धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बंद
- धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याने गोदावरीचा पूर देखील ओसरला
- मागील तीन दिवसांपासून सुरू होता गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
- मागील दोन ते तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा ८८ टक्क्यांवर
Satara News : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या अश्वारूढ स्मारकाचे आज म्हसवडला भूमिपूजनम्हसवड : येथील पालिका कार्यालयासमोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्या (शनिवार) सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांसह धनगर समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले आहे.
Tejashwi Yadav News : राजद नेते तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गडचिरोलीत एफआयआर दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल गडचिरोली येथे राजद नेते तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गडचिरोलीचे भाजप आमदार मिलिंद रामजी नरोटे यांच्या तक्रारीवरून राजद नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pandharpur Rain : पंढरीत पुराचे संकट टळले; चंद्रभागेच्या पाणीपातळीत घटपंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून भीमानदीत पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गात शुक्रवारी (ता. २२) मोठी घट झाली. त्यामुळे पंढरपूरकरांवरील महापुराचे संकट टळले आहे. नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाबरोबरच नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेल्याने रात्री उशिरापर्यंत पंढरपूर - मंगळवेढा मार्गावरील वाहतूक बंद होती.
Lord Swaraj Paul Passes Away : लॉर्ड स्वराज पॉल यांचे लंडन येथे निधनलंडन/नवी दिल्ली : ब्रिटनमधील आघाडीचे अनिवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल (वय ९४) यांचे गुरुवारी संध्याकाळी लंडन येथे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना उद्योग जगतातून व्यक्त होत आहे.
Jawan Devdas Rajput : भारतीय सैन्य दलातील जवान देवदास रजपूत यांना वीरमरणदुधेबावी : जावली (ता. फलटण) येथील देवदास दिलीप रजपूत या भारतीय सैन्य दलातील जवानाला राजस्थानमधील नासेराबाद येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराने वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
President Draupadi Murmu : पैसे देऊन खेळण्यात येणाऱ्या 'ऑनलाइन गेमिंग’ विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीLatest Marathi Live Updates 23 August 2025 : पैसे देऊन खेळण्यात येणाऱ्या ऑनलाइन गेमिंगवर प्रतिबंध घालणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले होते. तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) कार्यकर्त्यांनी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती वाचनालयाच्या बाहेर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. ब्रिटनमधील आघाडीचे अनिवासी भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल (वय ९४) यांचे गुरुवारी संध्याकाळी लंडन येथे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेतील रमी खेळतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहित पवार यांनी बदनामीकारक पोस्ट लिहिल्याप्रकरणी कोकाटे यांनी त्यांना मानहानीचे नोटीस बजावली आहे. रोहित पवार यांनीच त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर ही नोटीस पोस्ट करून माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून यंदा २ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विजयादशमी उत्सवास माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार आहेत. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..