तुमच्याही मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 आहे का? मग तुम्हाला येतील हे अनुभव
Tv9 Marathi August 24, 2025 05:45 AM

वास्तूशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रालाही तेवढंच महत्त्व असतं. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा वाढदिवसानुसार, त्यांच्या भाग्यांकानुसार भविष्य पाहिले जाते. पण हे आता अजून एक ट्रेंड आला आहे तो म्हणजे मोबाईलच्या नंबरवरून भविष्य सांगणे किंवा त्याचे फायदे-तोटे सांगणे. जसं की एखाद्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरचे विश्लेषण करून त्याचे भविष्य सांगितले जाते.

तुमचा मोबाईल नंबर तुमचे नशीब बदलू शकतो

अंकशास्त्रानुसार मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक खूप महत्वाचे मानले जातात. त्याच्या मदतीने तुमचा व्यवसाय किंवा करिअर कसे असेल हे सांगितले जाते. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलून तुमचे नशीब बदलू शकता असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरच्या शेवटचा अंक 6 असेल त्याबद्दल जाणून घेऊयात.

मोबाईल नंबरमध्ये शेवटी किंवा मध्ये कुठेही 6 नंबर असेल तर….

महिलांचे कॉल जास्त असू शकतात.

अंकशास्त्रात, 6 क्रमांकाचा अधिपती ग्रह शुक्र आहे. शुक्र हा राक्षसांचा गुरु आहे. ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा भौतिक सुखसोयी, सौंदर्य, ग्लॅमर इत्यादींचा प्रतिनिधी मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलचा शेवटचा क्रमांक 6 असेल, तर जो कोणी व्यक्ती त्याला कॉल करेल तो खूप गोड बोलेल. दुसरी व्यक्ती देखील अनेक वेळा त्याच्याशी चांगलंच बोलेल. दरम्यान 6 क्रमांकाच्या व्यक्तीला जे काही कॉल येतील, त्यात महिलांचे कॉल जास्त असू शकतात.

कुटुंबाबद्दलच्या प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक

6 हा अंक एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दलच्या प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक आहे. हा अंक तुमच्या आयुष्यातील संपत्ती आणि पैशाचे देखील प्रतीक आहे. 6 हा अंक आराम आणि प्रेमाचे जीवन देखील दर्शवतो.

व्यवसायात फायदा 

जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल आणि त्या व्यवसायाचा किंवा कंपनीचा मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 असेल, तर तुम्हाला कॉल करणारा ग्राहक खूप गोड बोलेल आणि तुमच्याशी सौदा करेल. तथापि, तुम्ही त्याची काळजी करू नये. जर तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला तर तो तुमचे उत्पादन देखील खरेदी करेल.

मेकअप स्टुडिओ, ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधने

जे लोक शुक्राशी संबंधित व्यवसाय करतात, विशेषतः मेकअप स्टुडिओ, ब्युटी पार्लर, सौंदर्यप्रसाधने इत्यादी सौंदर्याशी संबंधित काम करतात त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 ठेवला तर त्यांना त्याचे लाभ मिळतील. त्यांना महिला ग्राहकांकडून बरेच कॉल येतील. त्या सौदा करतील, जर तुम्ही त्यांना योग्य किमतीत सेवा दिली तर तुम्हाला फायदा नक्कीच होईल.

बिजनेस निगोशिएशनशी संबंधित व्यवसायात बढती

ज्या लोकांचा व्यवसाय बिजनेस निगोशिएशनशी संबंधित आहे म्हणजे ज्या नोकरीमध्ये त्यांना सतत दुसऱ्यांशी संवाद साधावा लागत असेल तर ते त्यांच्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक 6 घेतला तर त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता असते.

सासू आणि सुनेचे नाते सुधारेल 

ज्या घरात सासू आणि सुनेचे पटत नसेल, तर त्या घरात त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक 6 जर घेतला तर शुक्राचा शुभ प्रभाव दिसून येईल आणि त्यांच्यातील नातेही सुधारेल

तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती

जर तुमच्या मोबाईलमध्ये एकदा 6 हा अंक असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारी व्यक्ती आहात. तुम्ही तुमच्या पालकांची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेता. तुम्ही एका प्रकारे कुटुंबातील सदस्य आहात. कुटुंबाला सुखसोयी आणि सुविधा पुरवण्यासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणारी व्यक्ती असू शकता.असा त्याचा अर्थ होतो.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.