सीबीआयनं अनिल अंबानी यांच्या मुंबईतील घरावर छापा टाकला.
प्रकरण १७ हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित आहे.
या घोटाळ्यामुळे स्टेट बँकेला तब्बल २ हजार कोटींचे नुकसान.
ईडीनंतर आता सीबीआयच्या कारवाईमुळे अंबानींच्या अडचणीत वाढ.
दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल १७ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने शनिवारी सकाळी मुंबईतील कफ परेड येथील सीविंड या निवासस्थानी छापा टाकला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ अधिकाऱ्यांकडून तपास सुरू आहे. ईडीनंतर सीबीआयनं छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सकाळी सातच्या सुमारास सीबीआयचे ७-८ अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. छाप्यादरम्यान अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंब घरी उपस्थित होते. ईडीच्या कारवाईनंतर आता सीबीआयनंहीकारवाई सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
भाजप आमदारावर डॉक्टरला मारल्याचा आरोप, क्षुल्लक कारणावरून दादागिरी; परिसरात खळबळसीबीआयनं रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अंबानी यांच्या प्रोजेक्ट्सशी संबंधित काही ठिकाणी छापे घालत एफआयआर दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीनं १७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांची चौकशी केली होती.
देहविक्रीचं मोठं रॅकेट, तरुणींचे फोटो पाठवायचे, १००० रुपये घेऊन घरीच....; आई-मुलाचा खरा चेहरा उघडघोटाळ्यातील कथित गैरव्यवहारामुळेस्टेट बँकेलातब्बल २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अंबानी यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांची मागणी केली होती, मात्र तपासकर्त्यांना अद्याप समाधानकारक माहिती मिळालेली नाही.
अनिल अंबानींच्या ठिकाणांवर सीबीआयचे छापे
१. येस बँकेनं दिलेल्या १७ हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा अंबानींवर आरोप.
२. अनिल अंबानींनी मंजूर कर्ज अन्य कंपन्यांत वळवल्याचा आरोप आहे.
३. अनिल अंबानींनी कागदपत्रे सादर करण्यास १० दिवसांचा मागितला कालावधी.
४. दहा दिवसांचा वेळ न देता सीबीआयची ६ ठिकाणांवर छापेमारी.
५. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतर ठिकाणी छापेमारी.