बीडमध्ये रक्तपात सुरुच, लहानसं भांडण झालं अन् हॉटेलबाहेर तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, नेम
Marathi August 24, 2025 03:25 PM

बीड गुन्हा: बीड जिल्ह्यातील हिंसाचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. ताज्या घटनेत, मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेलबाहेर केवळ किरकोळ वादावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुण रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

ताज्या प्रकरणात मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावर असलेल्या एका हॉटेलबाहेर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या तरुणाचे नाव विजय केदार (रा. सांगवी, ता. केज) असे आहे. घटनेच्या वेळी विजय केदार महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये गेला होता. त्यावेळी त्याचा वेटरसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की हॉटेल मालकाने देखील यात हस्तक्षेप करत विजयवर हल्ला चढवला. हल्ल्यात वेटर आणि हॉटेल मालक दोघांनी मिळून विजयला बेदम मारहाण केली.

माहितीनुसार, दोघांमध्ये आधी वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्र आणि लाकडी वस्तूंनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तरुणाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.  या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदविला गेलेला नाही. तरुणाच्या तक्रारीनुसार लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे. महामार्गावरील हॉटेलमध्ये अशा घटना घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घरात मारलं, खोक्यात भरलं, पण विल्हेवाट लावताना CCTV मध्ये दिसलं

एका पुरुषासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून बीडमध्ये धक्कादायक खुनाची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने आपल्या मैत्रीण आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा. लुखा मसला, ता. गेवराई) हिचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला खोक्यात भरून आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकीवरून दूर नेऊन नाल्यात फेकण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचे सारे कारनामे उघड झाले आणि अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.