Bigg Boss 19 चे 16 स्पर्धक, 5 व्याला पाहून म्हणाल, शो तर हाच जिंकेल
Tv9 Marathi August 24, 2025 09:45 PM

अभिनेता सलमान खान होस्टेड वादग्रस्त शो ‘बिग बॉस 19’ प्रीमियर काही तासांत होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील शोची उत्सुकता पाहायला मिळत आहे. शोमध्ये कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून दिसणार आहेत… याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. यावेळी यादीमध्ये प्रसिद्धी टीव्ही कलाकार आणि यूट्यूबर्सचं नाव सामिल आहे.. निर्मात्यांनी प्रोमोद्वारे 4 स्पर्धकांची नावे उघड केली आहेत. व्हिडिओमध्ये चेहरे दिसत नसले तरी चाहत्यांना हे स्पर्धक कोण आहेत हे कळलं आहे. यामध्ये गौरव खन्ना ते आवेज दरबारपर्यंतची नावे सामिल आहेत.

अभिनेता गौरव खन्नाचा प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेत्याचा चेहरा ओळखता येत नाही. पण तो गैरव आहे असं चाहत्यांना कळलं आहे…

बिग बॉस 19 शोच्या स्पर्धकांच्या यादीत टीव्ही अभिनेत्री अशनूर कौरचे नावही असल्याची चर्चा आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. ‘ना बोले तुम ना मैंने कुछ कहा’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘पटियाला बेब्स’ मधील भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे.

अभिनेत्री गौहर खानचा दीर आवेज दरबार हा एक लोकप्रिय कोरिओग्राफर, डान्सर, इन्फ्लुएंसर आणि युट्यूबर आहे. इस्माईल दरबार यांच्या मुलाला टिकटॉक डान्स व्हिडिओंमुळे लोकप्रियता मिळाली. त्याचे इंस्टाग्राम आणि युट्यूबवर लाखो फॉलोअर्स आहेत.

नगमा मिरजकर ही मुंबईची एक डिजिटल क्रिएटर आहे. तिने मेबेलाइन आणि अमेझॉन सारख्या ब्रँडसोबत काम केलं आहे. तिने लंडन फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील केला आहे. तिचं नाव देखली स्पर्धकांच्या यादीत चर्चेत आहे…

लोकप्रिय टीव्ही अभिनेता धीरज धूपर देखील बिग बॉसमध्ये सहभागी होत असल्याच्या चर्चा आहेत. तो ससुराल सिमर का आणि कुंडली भाग्य द्वारे लोकप्रिय झाला आहे. त्याची गणती टीव्हीच्या सुपरस्टारमध्ये होते. तो शो जिंकेल असं देखील त्याचे चाहते म्हणत आहेत.

मॉडेल-अभिनेता बसीर अली याने एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला 10 जिंकला आहे. तो रोडीज रायझिंग आणि एस ऑफ स्पेस 2 मध्येही उपविजेता होता. तो कुंडली भाग्य मध्ये शौर्यची भूमिका साकारताना दिसला आहे.

विनोदी कलाकार, आरजे आणि कंटेंट क्रिएटर प्रणित मोरे याने सेल्स आणि रेडिओमधून कॉमेडीकडे वाटचाल केली आणि कॅनव्हास लाफ क्लब ओपन माइक जिंकला. ते त्याच्या “बाप को मत सिखा” आणि “बॅक बेंचर” या एकल शोसाठी ओळखला जातो.

दिग्गज अभिनेत्री कुनिका सदानंद देखील या शोचा भाग असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तिने कारकिर्दीची सुरुवात “कब्रिस्तान” पासून केली होती. तिने “बेटा” आणि “गुमराह” सारख्या 110 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

संगीतकार, गायक, निर्माता आणि गीतकार अमाल मलिक याने “जय हो” पासून सुरुवात केली. त्यांना “एमएस धोनी” आणि “कबीर सिंग” द्वारे लोकप्रियता मिळाली. तो अरमान मलिक याचा मोठा भाऊ आहे.

भारतीय लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता जीशान कादरी देखील शोचा भाग असू शकतो… तर अभिनेता आणि मॉडेल अभिषेक बजाज याचं नाव देखील चर्चेत आली… ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

मॉडेल आणि व्यावसायिक तान्या मित्तल ही मिस एशिया टुरिझम युनिव्हर्स 2018 आहे. तिने हँडमेड लव्ह ब्रँड तयार केला आहे. तर भोजपुरी अभिनेत्री गिरी बाबुल हिचं नाव देखील स्पर्धक म्हणून चर्चेत आहे.

युट्यूबर आणि अभिनेता मृदुल तिवारी त्याच्या युट्यूब चॅनेलसाठी लोकप्रिय आहे. तो विनोदी स्केचेस बनवतो आणि त्याचे लाखो सबस्क्राइबर्स आहेत. नुकताच, शाहबाजसह शोसाठी त्याची निवड झाल्याचा व्हिडिओ एका प्रोमोमध्ये समोर आला आहे.

प्रसिद्ध पायल धारे ही भारतातील टॉप महिला गेमर आहे. ती YouTube वर मोबाईल गेम स्ट्रीम करते. तिने 2024 मध्ये मोबाईल स्ट्रीमर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. वियन डीसेना याची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री वहबिझ दोराबजी प्यार की ये एक कहानी, सरस्वतीचंद्र आणि बहू हमारी रजनीकांत सारख्या शोसाठी लोकप्रिय आहे. ती देखील शोमध्ये दिसेल अशी चर्चा आहे..दिग्गज बॉक्सर माइक टायसन बिग बॉस 19 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून सामील होऊ शकतात. टायसन यापूर्वी मुझसे शादी करोगी या बॉलिवूड सिनेमात दिसला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.