पुण्यातल्या वैष्णवी हगवणेसारखं प्रकरण ग्रेटर नोएडामध्ये घडलं आहे. हुंड्यासाठी सासरकडच्यांनी नक्कीला जाळून मारलं. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पती विपिनची पोलिसांसोबत चकमक झाली. चकमकीत विपिनच्या पायाला गोळी लागली आहे. तो पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी ही चकमक झाली. पोलिसांनी विपिनचा पाठलाग केला. पण तो थांबला नाही. त्यानंतर पोलिसांनी गोळी चालवली, जी विपिनच्या पायाला लागली. सध्या त्याला अटक करण्यात आली आहे. रविवारी दुपारी पोलिसांची टीम आरोपीला थिनर बॉटल जिथून विकत घेतली, तिथे घेऊन चाललेले. त्याचवेळी विपिनने पोलिसांची पिस्तुल हिसकावली व पळू लागला. त्यानंतर पोलिसांनी गोळी चालवली, ती त्याच्या पायाला लागली.
पुण्याच्या वैष्णवी हगवणेसारखं हे प्रकरण आहे. हुंड्यासाठी नक्कीची हत्या केल्याचा आरोप आहे. विपिनवर आरोप आहे की, त्याने नक्कीचे केस पकडून तिला ओढत नेलं. त्यानंतर तिची बहिण आणि स्वत:च्या मुलासमोर निक्कीला पेटवून दिलं. पीडितेच्या सहावर्षाच्या मुलाने आपल्या डोळ्यासमोर हे सर्व पाहिलं. मुलाने सांगितलं की, “माझ्या आईच्या अंगावर काहीतरी टाकलं. तिच्या कानाखाली मारली व लायटर लावून तिला पेटवून दिलं”
नवरा विपिनला पश्चाताप नाही, म्हणतो की…
निक्कीच्या हत्येचा आरोप असलेल्या विपिनची प्रतिक्रिया आली आहे. विपिनला त्याच्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाहीय. “मी तिला मारलं नाही. ती स्वत: मरण पावली. पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं होत असतात, ही सामान्य बाब आहे” असं विपिन सांगतोय.
व्हिडिओमध्ये काय आहे?
या भयानक घटनेचे दोन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये पीडितेला मारहाण करुन तिचे केस ओढत तिला घराबाहेर नेताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आग लावल्यानंतर निक्की लंगडत शिड्यांवरुन खाली उतरताना दिसतेय.
निक्कीचे वडिल काय म्हणाले?
विपिनच्या एन्काऊंटरनंतर निक्कीचे वडिल मीडियाशी बोलले. ते म्हणाले की, पोलिसांनी योग्य तेच केलं. जो गुन्हेगार असतो, तो पळण्याचा प्रयत्न करतो. विपिन गुन्हेगार आहे. आमची विनंती आहे की, पोलिसांनी अन्य आरोपींना सुद्धा पकडावं. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी.
निक्कीची सासू तिच्यासोबत कसं वागायची?
विपिन आणि त्याची आई निक्कीला नेहमीच मारहाण करायचे. विपिनला दारु पिण्याची सवय होती. दारु पिऊन घरी यायचा आणि निक्कीला मारहाण करायचा. निक्कीने विरोध केल्यानंतर दोघे आई-मुलगा मिळून तिला मारायचे. 21 ऑगस्टला हद्द झाली. विपिन आणि त्याच्या आईने मिळून निक्कीला जिवंत जाळलं. दोघांनी आधी तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं व तिला पेटवून दिलं.