ट्रम्प यांना मोठा झटका, नवी दिल्लीची मोठी खेळी, अमेरिकेच्या मित्रानेही फिरवली पाठ, पुतिननंतर हा नेताही भारताच्या भेटीवर
Tv9 Marathi August 24, 2025 06:45 PM

अमेरिका आणि रशियाशी भारताचे हितसंबंध जगजाहीर आहे. भारताने गेल्या कित्येक वर्षांपासून दोन्ही देशांशी सख्य ठेवले. त्यात रशिया-भारताची मैत्री ही जगविख्यात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नमवण्यासाठी पाकिस्तानला जवळ करत आहे. त्याचवेळी नवी दिल्लीने मोठी खेळी खेळली. युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी दिल्ली येथील कुतुब मिनार युक्रेनी झेंड्याच्या रंगात न्हाऊन निघाला. हा अमेरिकेला थेट संदेश होता. रशिया-युक्रेन युद्धाचे खापर अमेरिका भारतावर फोडत असतानाच ही घटना घडली आहे. आता त्याचे सकारात्मक परिणाम आणि पडसाद दिसून येत आहे.

पुतिन आणि झेलेन्स्की पण भारत दौऱ्यावर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. तर भारत आणि युक्रेन यांचे संबंध सुद्धा दृढ झाल्याचे समोर येत आहे. यापूर्वी मोदींनी झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. दिल्लीतील कुतुब मिनार युक्रेनच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झेंड्याच्या रंगांनी उजळून निघाला. युक्रेनचे राजदूत ऑलेक्झेंडर पोलिशचूक यांनी आता एक मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले की भारत आणि युक्रेन यांच्यातील संबंध झपाट्याने प्रगतीच्या वाटेवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेलेन्स्की यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. दोन्ही देश या भेटीची तारीख निश्चित करत आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भारत भेटीवर येतील, अशी आशा राजदूत पोलिशचूक यांनी व्यक्त केली आहे.

वर्षाच्या अखेरीस पुतिन यांचा दौरा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर येत आहेत. काही आठवड्यांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे रशिया दौऱ्यावर होते. त्यांनी पुतिन हे या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार असल्याचे स्पष्ट केले होते. रशियाची वृत्तसंस्था इंटरफॅक्सने सुद्धा या दाव्याला दुजोरा दिला. पुतिन हे डिसेंबर 2025 मध्ये भारतात येण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांना मोठा झटका

युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देण्याचे कार्ड अमेरिकन सरकारने फेकले होते. त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध पेटले. हे युद्ध थांबवण्यासाठी भारत सुद्धा आग्रही आहे. पण या युद्धाच्या आडून ट्रम्प हे भारतावर दबाव टाकत आहे. ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ आणि दंड आकारण्याचा घाट घातला आहे. पण नवी दिल्लीने या दबावतंत्राला भीक घातलेली नाही. आता अमेरिकेचे मित्र झेलेन्स्की सुद्धा भारत भेटीवर येण्याची शक्यता वाढल्याने अमेरिकेच्या धोरणावर जागतिक तज्ज्ञांनी ताशेरे ओढले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.