आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात श्रेयस अय्यरला संधी देण्यात आलेली नाही.
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या निर्णयावर टीका केली आहे.
गिलच्या निवडीमुळे श्रेयसच्या सातत्यपूर्ण कामगिरीकडे दुर्लक्ष झाल्याचे मांजरेकरांचे मत आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची १९ ऑगस्ट रोजी निवड झाली. भारतीय संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होते.
भारतीय संघाच्या घोषणेनंतर एक मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला, तो म्हणजे श्रेयस अय्यरची न झालेली निवड. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्यपूर्ण धावा केल्यानंतरही श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने निवड समितीवर टीका होत आहे.
Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...श्रेयस अय्यरला १५ जणांच्या मुख्य संघात तर संधी दिलेली नाहीच, पण राखीव खेळाडूंमध्येही त्याला संधी देण्यात आलेली नाही. याबाबत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही टीका केली आहे. त्यांनी श्रेयसच्या ऐवजी शुभमन गिलल संधी देण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. गिलने नुकत्याच संपलेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना ७५४ धावाही ठोकल्या होत्या.
त्यांनी इंस्टाग्रामवर बोलताना म्हटले की 'जेव्हा मी एखाद्या खेळाडूला त्याच्या कसोटीतील कामगिरीचे बक्षीस म्हणून टी२० संघात जागा दिल्याचं पाहिलं, तेव्हा मला त्यातील क्रिकेटचे तर्क काही दिसले नाहीत. त्याला काहीच अर्थ नव्हता.' दरम्यान, मांजरेकरांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी गिलच्या निवडीबद्दल अप्रत्यक्षरित्या टीका केली.
मांजरेकर पुढे म्हणाले, 'श्रेयसला या आशिया कपसाठी भारताच्या टी२० संघात संधी न देणे हे आश्चर्यकारक आहे. कारण हा तोच खेळाडू आहे, ज्याला भारतीय संघातून योग्य कारणास्तव बाहेर ठेवण्यात आलं होतं. कारण संघव्यवस्थापनाला त्यावेळी तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला पूर्ण सिद्ध करत नसल्याचे वाटत होते. याचा परिणाम श्रेयस अय्यरवर योग्य झाला.'
'इंग्लंडविरुद्ध जेव्हा तो मायदेशातील वनडे मालिकेत खेळण्यासाठी परतला, त्यावेळी त्याची फलंदाजी पाहून त्याने यापूर्वी कधीही अशी फलंदाजी केली नसल्याचं जाणवलं. त्यावेळी त्या मालिकेत त्याच्याकडून एकही चुकीचं पाऊल पडलं नव्हतं. त्याने तोच फॉर्म आयपीएलमध्येही दाखवला.'
शुभमन गिलला आशिया कपसाठी उपकर्णधारही करण्यात आले आहे. यामागील कारण सांगण्यात आले की त्याला २०२४ श्रीलंका दौऱ्यातील टी२० मालिकेत उपकर्णधारपद देण्यात आले होते. पण त्यानंतर इतर मालिकांमुळे तो टी२० खेळू शकला नव्हता. पण आता तो परत टी२० संघात परतल्याने त्याला ही जबाबदारी पुन्हा देण्यात आली. मात्र यावर मांजरेकरांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
View this post on InstagramA post shared by Sanjay Manjrekar (@sanjaysphotos)
मांजरेकर म्हणाले, 'आयपीएल हंगामात त्याच्याइतका जबदरदस्त फॉर्म मला फार कोणाचा दिसला नाही. ५० हून अधिकची सरासरी आणि १७० हून अधिकचा स्ट्राईक रेट होता. त्याला याचे बक्षीस काय मिळाले, तर ते म्हणजे संघात संधी न मिळणे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने टी२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही त्याला संघाबाहेर ठेवले आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला टी२० संघात संधी दिली आहे. हा अन्याय आहे.'
'श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूला बाजूला करून कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामहिरी करणाऱ्या खेळाडूला टी२० मध्ये संधी दिली जाते. मला वाटतं सध्या संघ निवडताना आणि प्लेइंग इलेव्हनची निवड करताना फारसे योग्य निर्णय घेतले जात नाहीत. भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आणि आशिया कपमध्येही चांगली कामगिरी करतील, पण तरीही जे चुकीचं आहे ते चुकीचेच आहे. मला वाटते की श्रेयस अय्यरबाबत निवड समितीने अत्यंत चूकीचं केलं आहे.'
Shreyas Iyer क्लिन बोल्ड! आईच्या 'गुगली' समोर हतबल, माऊलीचा जल्लोष एकदा पाहाच, Video Viralश्रेयस अय्यरने आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना १७ सामन्यांत ५०.३३ च्या सरासरीने ६ अर्धशतकांसह १७५.०७ च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या. तो त्याआधी भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज होती.
त्याने भारतासाठी अखेरचा टी२० सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला आहे. त्याला नंतर टी२० संघात संधी देण्यात आलेली नाही. पण नंतर त्याने आयपीएल २०२४ स्पर्धा कोलकाता नाईट रायडर्ससाठी जिंकली. त्याने सईद मुश्ताक अली टी२० स्पर्धा मुंबईचे नेतृत्व करताना जिंकली. तसेच पंजाब किंग्ससाठीही चांगला खेळ केला.
शुभमन गिलने भारतासाठी शेवटचा टी२० सामना जुलै २०२४ मध्ये खेळला आहे. त्याने आयपीएल २०२५ मध्ये १५ सामन्यांत ५० च्या सरासरीने ६ अर्धशतकांसह आणि १५५.८७ च्या स्ट्राईक रेटने ६५० धावा केल्या होत्या.
FAQsप्रश्न: श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात स्थान मिळाले का?
उत्तर: निवड समितीने श्रेयस अय्यरला मुख्य संघात किंवा राखीव खेळाडूंमध्येही स्थान दिलं नाही, ज्यामुळे वाद निर्माण झाला.
(Is Shreyas Iyer included in India's Asia Cup 2025 squad?)
प्रश्न: संजय मांजरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: संजय मांजरेकर यांनी शुभमन गिलच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करत श्रेयस अय्यरवर अन्याय झाल्याचं म्हटलं.
(What did Sanjay Manjrekar say about the selection?)
प्रश्न: शुभमन गिलला उपकर्णधार का करण्यात आलं?
उत्तर: २०२४ श्रीलंका दौऱ्यातही तो टी२० संघाचा उपकर्णधार होता आणि त्यामुळे त्याला पुन्हा ती जबाबदारी देण्यात आली.
(Why was Shubman Gill named vice-captain?)
प्रश्न: श्रेयस अय्यरची आयपीएल २०२५ कामगिरी कशी होती?
उत्तर: त्याने १७ सामन्यांत ६०४ धावा केल्या, ५०.३३ सरासरी व १७५ स्ट्राईक रेट होता.
(How was Shreyas Iyer’s IPL 2025 performance?)
प्रश्न: शुभमन गिलने शेवटचा टी२० सामना कधी खेळला होता?
उत्तर: शुभमन गिलने भारतासाठी शेवटचा टी२० सामना जुलै २०२४ मध्ये खेळला होता.
(When did Shubman Gill last play a T20I for India?)