एयरटेलने त्यांच्या फेमस रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केला आहे
हा बदल काय आहे जाणून घ्या सविस्तर
Airtel Recharge : टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एअरटेलने पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने आपला लोकप्रिय 249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद केल्यानंतर आता 195 रुपयांच्या डेटा व्हाउचर प्लॅनमध्येही मोठी कपात केली आहे. या बदलांमुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे तरी कंपनीने काही नव्या ऑफर्स सुरू केल्या आहेत.
एअरटेलच्या 195 रुपयांच्या डेटा व्हाउचरमध्ये यापूर्वी 15 जीबी डेटा मिळत होता. आता कंपनीने यात कपात करत डेटा मर्यादा 12 जीबीवर आणली आहे. या प्लॅनमध्ये कोणतीही कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा मिळत नाही परंतु 90 दिवसांच्या वैधतेसह जिओहॉटस्टार मोबाईलचा अॅक्सेस मिळेल. हा प्लॅन देशभरातील सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. या डेटा कपातीमुळे जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...याशिवाय एअरटेलने 249 रुपयांचा सर्वात स्वस्त डेली 1 जीबी डेटा प्लॅन बंद केला आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदेही मिळत होते. आता ग्राहकांना डेली 1 जीबी डेटा हवा असल्यास किमान 299 रुपये खर्चावे लागतील. हा बदल ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने एक खास ऑफर आणली आहे.
Dmart Offers : डीमार्टपेक्षा जास्त स्वस्त सामान कुठं मिळतं? पाहा एका क्लिकवरकंपनी आपल्या वापरकर्त्यांना पर्प्लेक्सिटी प्रो सबस्क्रिप्शन मोफत देत आहे ज्याची वार्षिक किंमत सुमारे 17000 रुपये आहे. ही ऑफर ग्राहकांचे नुकसान काही प्रमाणात भरून काढू शकते पण डेटा कपात आणि प्लॅन बंदच्या निर्णयामुळे अनेक ग्राहक नाराज आहेत. एअरटेलच्या या धोरणांमुळे टेलिकॉम बाजारात स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. ग्राहक आता जिओ आणि व्होडाफोन आयडियाच्या पर्यायांचा विचार करू शकतात.
FAQsWhat changes were made to Airtel’s Rs 195 plan?
एअरटेलच्या 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय बदल झाले?
या प्लॅनमधील डेटा 15 जीबीवरून 12 जीबीवर कमी करण्यात आला आहे, पण 90 दिवसांची वैधता आणि जिओहॉटस्टार मोबाईल अॅक्सेस कायम आहे.
Why was the Rs 249 plan discontinued?
249 रुपयांचा प्लॅन का बंद करण्यात आला?
एअरटेलने हा सर्वात स्वस्त डेली 1 जीबी डेटा प्लॅन बंद केला, आता ग्राहकांना 299 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल.
What is the Perplexity Pro subscription offered by Airtel?
एअरटेलने ऑफर केलेले पर्प्लेक्सिटी प्रो सबस्क्रिप्शन म्हणजे काय?
पर्प्लेक्सिटी प्रो हे 17000 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन आहे, जे एअरटेल ग्राहकांना मोफत देत आहे.
Does the Rs 195 plan include calling or SMS benefits?
195 रुपयांच्या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचे फायदे आहेत का?
नाही, हा फक्त डेटा व्हाउचर प्लॅन आहे, यात कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा नाही.
Is the Rs 195 plan available across India?
195 रुपयांचा प्लॅन संपूर्ण भारतात उपलब्ध आहे का?
होय, हा प्लॅन देशभरातील सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध आहे.