पारगाव, ता. २४ : दत्तात्रयनगर (पारगाव) ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव सन २०२५-२६ निमित्त बुधवार (ता.२७) ते मंगळवार (ता.०२) पर्यंत भजनस्पर्धा, सत्यनारायण महापूजा, आरोग्य विषयक मार्गदर्शन व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
श्री गणेश मूर्तीची बुधवारी (ता.२७) सकाळी १० वाजता प्रतिष्ठापना, सायंकाळी ५ ते ७ श्री ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ (पारगाव) यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम तसेच दररोज सकाळी ८.१५ वाजता व सायंकाळी ५.३० वाजता महाआरती गुरुवार (ता.२८), शुक्रवार (ता. २९) व रविवार (ता. ३१) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवारी (ता. ३०) सकाळी १० ते १२ डॉ. सदानंद राऊत यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन, सोमवार (ता.०१) सकाळी ९ ते १० सत्यनारायण महापूजा, ११ ते १२ पर्यंत महाप्रसाद, दुपारी २ ते ५ युवा निवेदक निलेश पडवळ यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. ०२) सकाळी १० ते ११ भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण, ११ ते १ शंकर महाराज शेवाळे यांचे थोडं जगण समाजासाठी या विषयावर व्याख्यान त्यानंतर गणेशाची महाआरती दुपारी दोन वाजता श्रींची विसर्जन मिरवणूक सोहळा आदी कार्यक्रम होणार असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.