SBI Credit Card : तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्ड विभाग (SBI Card) सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजे 1 सप्टेंबर 2025 पासून त्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहे. या बदलांमुळे काही कार्ड्सवरील रिवॉर्ड पॉइंट्स संपुष्टात आणले जातील, ज्याचा थेट परिणाम कार्डधारकांवर होणार आहे.
या क्रेडिट कार्डांसाठी नियम बदलत आहेतएसबीआय कार्डने दिलेल्या माहितीनुसार,
Lifestyle Home Centre SBI Card,
Lifestyle Home Centre SBI Card Select
आणि Lifestyle Home Centre SBI Card Primeया कार्डांवर मिळणाऱ्या लाभांमध्ये कपात केली जाणार आहे.
या व्यवहारांवर आता रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नव्या नियमांनुसार, एसबीआय कार्ड्सने स्पष्ट केले की, वरील नमूद क्रेडिट कार्ड्सचा वापर करून ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या कोणत्याही व्यवहारावर आता रिवॉर्ड पॉइंट दिले जाणार नाहीत. याव्यतिरिक्त, जर ग्राहकांनी कोणत्याही प्रकारचे सरकारी व्यवहार किंवा सरकारी सेवांसाठी पैसे दिले, तर अशा खर्चांवरही कोणतेही रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. व्यापाऱ्यांसोबतच्या व्यवहारांवरही याच प्रकारचे नियम लागू होतील.
यासोबतच, 16 सप्टेंबर 2025 पासून सर्व कार्ड प्रोटेक्शन प्लॅन (CPP) एसबीआय कार्ड ग्राहक त्यांच्या संबंधित नूतनीकरण तारखेनुसार आपोआप अद्ययावत केलेल्या प्लॅनमध्ये (अपडेटेड प्लॅन वेरिएंट) हस्तांतरित केले जातील.
गेल्या महिन्यात ही सेवा बंदएसबीआय कार्ड्सने यापूर्वीही त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही मोठे बदल करण्यात आले होते. उदाहरणार्थ, काही एसबीआय ईलाईट आणि एसबीआय प्राइम कार्डधारकांना मिळणारे 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे पूरक हवाई अपघात संरक्षण (Complimentary Air Accident Cover) एसबीआय कार्डने बंद केले होते.