“गेल्या 11 वर्षात मुंबई शहराचा कायापालट, मुंबईत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न त्याचा रिझल्ट मुंबईकरांना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या 11 वर्षात काम केलय तसाच विकास, उन्नती आणि प्रगती मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत” असं मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलं. “मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर निवडून आणण्याकरता, मुंबईकरांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी कठोर प्रयत्न करु. येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्यासाठी कटिबद्ध आहोत” असं अमित साटम यांनी सांगितंलं.
“आपण गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीत कुठल्या उमेदवाराच्या प्रचार फेरीमध्ये इकबाल मुसा या बॉबस्फोटाच्या आरोपीला फिरताना पाहिलय, कुठल्या उमेदवाराच्या प्रचारात पाकिस्तानी झेंडे फडकलेले आहेत ते आपण पाहिलं. मतांच्या राजकारणासाठी काही लोक मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करु पाहतायत. वर्सोवा पॅटर्न विधानसभा निवडणुकीत पाहिला, तशाच प्रकारचा पॅटर्न संपूर्ण मुंबईत लागू करण्याचा प्रयत्न कोण करतय? अशा प्रकारचा मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. मुंबईचा विकास आणि सुरक्षा याची हमी आम्ही देतो” असं अमित साटम म्हणाले.
ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर काय म्हणाले?
ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावरही नवीन अध्यक्ष अमित साटम व्यक्त झाले. “आधी एकत्रच होते. नंतर एकाभावाने दुसऱ्या भावाला का बाहेर काढलं?. कुणीही एकत्र आलं, तरी गेल्या 11 वर्षात मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, चौफेर लागलेले सीसीटीव्ही हे डोळ्यासमोर दिसतय. बीडीडीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला मुंबईत घर मिळालं. एकापाठोपाठ एक क्रांतीकारी बदल गेल्या 11 वर्षात मुंबईत दिसून आले” असं अमित साटम यांनी सांगितलं.
अमित साटम हे मुंबई उपनगरातील आमदार
प्रदेश भाजपकडून आज नव्या मुंबई भाजप अध्यक्षाची निवड जाहीर करण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीआधी घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे. अमित साटम यांना मुंबई भाजपच अध्यक्ष बनवण्यात आलं. अमित साटम हे मुंबई उपनगरातील आमदार आहेत. भाजपचा आक्रमक आणि अभ्यासू चेहरा म्हणून अमित साटम यांची ओळख आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.