Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 254 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?
esakal August 25, 2025 09:45 PM
  • आज भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात करत सेन्सेक्स 254 अंकांनी आणि निफ्टी 75 अंकांनी वाढला.

  • आयटी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली.

  • जागतिक तेजी, व्याजदर कपातीच्या अपेक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील मोठ्या डीलमुळे बाजारात सकारात्मक वातावरण आहे.

Stock Market Opening Today: आज भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. सेन्सेक्स तब्बल 254 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर निफ्टी 75 अंकांनी वाढला. बँक निफ्टीतही खरेदी झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यामध्ये आयटी इंडेक्स सुमारे दीड टक्क्यांनी वाढला.

जागतिक संकेतांचा प्रभाव

जागतिक बाजाराकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा भारतीय बाजारावर मोठा प्रभाव दिसून आला.

  • अमेरिकन बाजार शुक्रवारी जोरदार वाढीसह बंद झाले. फेडकडून व्याजदर कपातीचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला. डाऊ जोन्स 850 अंकांची झेप घेत ऐतिहासिक उच्चांकावर गेला, तर नॅस्डॅक 400 अंकांनी वधारला.

  • आशियाई बाजारातही तेजी होती. जपानचा निक्केई 300 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता.

  • गिफ्ट निफ्टी 50 अंकांनी वर जाऊन 24,950च्या आसपास स्थिरावला.

Stock Market Opening Today शेअर बाजारासाठी प्रमुख ट्रिगर्स

1. दिवाळीपूर्वी सरकार अॅक्शन मोडमध्ये असून, 3-4 सप्टेंबरला दिल्ली येथे जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. अनेक श्रेणींमध्ये कर कपातीचे निर्णय होऊ शकतात.

2. सोन्या-चांदीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 3,410 डॉलर पर्यंत वाढले, तर चांदी 39 डॉलरवर पोहोचली. देशांतर्गत बाजारातसोने ₹1,000 तर चांदी ₹ 2,500 ने वाढली.

Car Prices: फक्त काही दिवस थांबा! गाड्या 1.5 लाखांनी स्वस्त होणार? काय आहे कारण? Stock Market Opening Today

3. एफआयआय आणि डीआयआय या दोन्ही गुंतवणूकदारांनी मागील सत्रात विक्री केली. एफआयआयने ₹4050 कोटींची तर डीआयआयने 329 कोटींची विक्री केली.

4. निफ्टी 50 इंडेक्समध्ये मोठे बदल होणार आहेत. IndiGo आणि Max Healthcare यांची एंट्री होईल, तर Hero MotoCorp आणि IndusInd Bank बाहेर जाणार आहेत. हे बदल 30 सप्टेंबरपासून लागू होतील.

BSE SENSEX

5. संरक्षण क्षेत्रातूनही मोठी बातमी आली आहे. जर्मनीसोबत तब्बल ₹70,000 कोटींच्या पाणबुडी कराराला हिरवा कंदील मिळाला आहे. दरम्यान, DRDO ने स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमचा यशस्वी चाचणीप्रक्षेपण केला.

6. बँकिंग सेक्टरमध्ये हालचाल वाढली आहे. जपानच्या SMBC बँकेलाYes Bank मध्ये 25% हिस्सेदारीच्या खरेदीस मंजुरी मिळाली आहे.

7. आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 29-30 ऑगस्टला जपान दौऱ्यावर तर 31 ऑगस्ट-1 सप्टेंबरला चीनमध्ये एससीओ समिटमध्ये सहभागी होणार आहेत.

एकूण चित्र असे की, जागतिक तेजी, व्याजदर कपातीची अपेक्षा, सोन्या-चांदीत वाढ आणि संरक्षण क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात सकारात्मक केली आहे.

CIBIL Score: सिबिल स्कोअर नसला तरी मिळणार कर्ज; जाणून घ्या काय आहे नियम? FAQs

Q1. आज सेन्सेक्स आणि निफ्टी किती अंकांवर उघडले?
- सेन्सेक्स 254 अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी 75 अंकांच्या वाढीसह उघडले.

Q2. कोणते सेक्टर्स आज सर्वाधिक वाढले?
- आयटी, मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये सर्वाधिक खरेदी झाली.

Q3. जागतिक बाजाराचा भारतीय बाजारावर कसा परिणाम झाला?
- अमेरिकन बाजारातील जोरदार तेजी, व्याजदर कपातीच्या अपेक्षा आणि आशियाई बाजारातील मजबुतीमुळे भारतीय बाजार सकारात्मक राहिला.

Q4. गुंतवणूकदारांसाठी या आठवड्यातील मोठे ट्रिगर्स कोणते आहेत?
- जीएसटी परिषदेची बैठक, निफ्टी-50 इंडेक्स रिबॅलन्सिंग, संरक्षण क्षेत्रातील डील आणि पंतप्रधानांचा परदेश दौरा हे प्रमुख ट्रिगर्स ठरणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.