Neem Juice on Empty Stomach: रिकाम्या पोटी कडुलिंबाचा रस प्यायल्यास काय होते? 'या' 5 आरोग्य समस्या कायमच्या होतील दूर
esakal August 25, 2025 09:45 PM

कडुलिंबाच्या पानांचा रस रिकाम्या पोटी पिल्याने पचनशक्ती वाढते, रक्त शुद्ध होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. यामुळे हृदय निरोगी राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. त्वचा निरोगी आणि चमकदार होते. सकाळी नाश्त्यापूर्वी 15-20 मिनिटे 10-20 मिली रस पिणे फायदेशीर आहे.

आयुर्वेदात कडुलिंबाच्या पानांना एक फायदेशीर औषध मानले जाते. कडुलिंबाच्या पानांमध्ये शरीर, त्वचा आणि केसांसाठी आवश्यक पोषक तत्वे असतात. म्हणूनच, अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये नेहमीच कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने शरीराचे अनेक आजार बरे होतात. रिकाम्या पोटी कडुलिंबाचा रस पिण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

पचनशक्ती वाढते

कडुलिंबाच्या पानांचा रस आतडे आणि पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ते पचनशक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पोटात गॅस तयार होणे यासारख्या समस्या कमी होतात. 

रक्त शुद्धीकरण

रिकाम्या पोटी नियमितपणे कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने रक्तातील अशुद्धता आणि विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील अनेक आजारांचा धोका देखील कमी होतो.

खराब कोलेस्ट्रॉल कमी

कडुलिंबाच्या पानांचा रस रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ते शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित करते. अशा प्रकारे ते हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. 

वजन कमी होणे

कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने लठ्ठपणा देखील कमी होतो. कडुलिंबाच्या पानांचा रस शरीराची पचनसंस्था सुरळित ठेवते. तसेच आणि शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्याचे काम करतो.

निरोगी त्वचेसाठी

कडुलिंबाचा रस नियमितपणे पिल्याने त्वचा निरोगी होते आणि चेहऱ्यावर चमक येते.

कडुलिंबाचा रस रिकाम्या पोटी पिण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता आहे?

उत्तर: सकाळी रिकाम्या पोटी, नाश्त्यापूर्वी 15-20 मिनिटे आधी कडुलिंबाचा रस पिणे उत्तम आहे.

कडुलिंबाचा रस किती प्रमाणात प्यावा?

उत्तर: दिवसाला 10-20 मिली कडुलिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यावा, जास्त मात्रा टाळावी.

कडुलिंबाचा रस कोणत्या आजारांवर फायदेशीर आहे?

उत्तर: मधुमेह, त्वचेचे विकार, पचनाच्या समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास फायदेशीर आहे.

कडुलिंबाचा रस पिण्याचे दुष्परिणाम काय असू शकतात?

उत्तर: जास्त प्रमाणात घेतल्यास पोटदुखी, मळमळ किंवा रक्तातील साखर खूप कमी होण्याची शक्यता असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.