Nikki Murder Case: वैष्णवी हगवने नंतर आता निक्की मर्डर प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. हुंड्याच्या छळामुळे ग्रेटर नोएडामध्ये निक्कीला तिचा पती विपिन आणि सासरच्या लोकांनी जाळून मारल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अनेकांना निक्ती प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. आता अभिनेत्री दिशा पटानी हिची बहीण आणि माजी लेफ्टनंट खुशबू पटानी यांनी स्वतःचं परखड मत तयार केलं आहे. सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खुशबू पटानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी निक्की हत्याकांड उघडकीस आलं. ज्यामध्ये ग्रेटर नोएडा येथील रहिवासी विपिनने त्याच्या आई आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह हुंडा मागणीवरून झालेल्या वादानंतर पत्नी निक्कीची हत्या केली.
सध्या याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असून खुशबू पटानी यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘महिलांविरोधात होणारे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीत. मनीषाच्या अग्निची आग अजून शांत झालेली नाही आणि आता निक्की हत्याकांडाचा विषय समोर आला आहे. हैराण करणारी मोठी गोष्ट म्हणजे स्त्रीच स्त्रीची शत्रू झाली आहे. जुन्या काळापासून फक्त महिलांचं शोषण होत आहे…’
‘आता महिलांनी समाजाचा चिंता करणं सोडलं पाहिजे आणि स्वतःच्या संरक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे… आता चारित्र्यावर शिकवण देण थांबवा आणि स्वतःसाठी लढायला शिका. कारण तुम्हालाच स्वतःचं रक्षण करावं लागणार आहे. ‘
याशिवाय पोस्टमध्ये खुशबू पटानी म्हणाल्या,मनीषा हिच्यानंतर आणि आता निक्की… चारित्र्याचे पुरावे देणारे आता कुठे गेले? निक्कीने कधी विचार देखील केला नसेल की तिच्यासोबत असं काही होईल… हा आहे आमचा आदर, आमच्या मुलींचा अधिकार, लाज वाटली पाहिजे अशा आई – वडिलांना जे हुंडा घेतात आणि जे हुंडा देतात… कायद्याने गुन्हा असला तरी हा धंधा मोठ्या जोरात सुरु आहे…
महिलांच्या चारित्र्यावर भाष्य करणारे सैतान आणि त्यांचे नेते सर्वत्र आहेत, पण आज ते गायब आहेत. आशा आहे की प्रशासन अशा सैतानांवर कठोर कारवाई करेल… जागो भारत जागो…, असं देखील खुशबू पटानी म्हणाल्या आहेत.