Ahilyanagar fraud: 'बनावट नोटांद्वारे फसवणूक; तिघे गजाआड', एक कोटीच्या बनावट नोटा जप्त
esakal August 25, 2025 09:45 PM

अहिल्यानगर: बनावट नोटा देवून अर्थिक व्यवहार करत फसवणूक करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. नगर- दौंड रस्त्यावरील कायनेटिक चौकाजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून तब्बल एक कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

SushilKumar Shinde: तीन-तीन पराभव पचवले, काँग्रेस संपत नाही: माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे; जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांचा सत्कार

इंद्रजित बिबीशन पवार (वय २९), दीपक राजेंद्र भांडारकर (वय ३२, दोघे रा. शांतीनगर, भोसरी ता. हवेली, जि. पुणे) व शरद सुरेश शिंदे (वय २९, रा. वरंवडी, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, कारवाई सुरू असताना आरोपी जितेंद्र ममता साठे (रा. वासुंदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याच्यासह चौघे फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कबाडी यांना या टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली. ही टोळी दौंड कडून नगरकडे एका पांढऱ्या रंगाची कार व दुचाकीने येत आहेत.

त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असून ते या नोटा खऱ्या असल्याचे भासवून अर्थिक व्यवहार करण्यासाठी येत आहेत. या माहितीनुसार कबाडी यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने नगर- दौंड रोडवरील कायनेटीक चौकापासून दोनशे मीटर अंतरावरील हनुमान मंदिराजवळ सापळा रचून कारमधून आलेल्या तिघा आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यावेळी दुचाकीवरील दोघे व कारमधील तिघे पळून गेले. सहायक निरीक्षक हरिष भोये, हेड कॉन्स्टेबल सुनिल पवार, सुरेश माळी, दीपक घाटकर, हृदय घोडके, भिमराज किसन खर्से, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळु खेडकर, मनोज साखरे, उमाकांत गावडे आदींनी ही कारवाई केली.

साडेनऊ लाखांच्या हुबेहुब नोटा

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी व कारची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एकुण नऊ लाख ५७ हजार रुपये किंमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या पाचशे रूपयांच्या नोटा, तसेच भारतीय बच्चो का बैंक ५०० रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा असलेले १२ बंडल, तसेच भारतीय बच्चो का बैंक ५०० रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा, तसेच भारतीय बच्चो का बैंक २०० रुपये असे छापलेले बंडल, त्यातील प्रत्येक बंडल मध्ये १०० कागदी नोटा, एक कार, दुचाकी, चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MP Bhausaheb Wakchoure: ‘शहापूर-घोटी’ला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्या: खासदार भाऊसाहेब वाकचौरे; रस्ते वाहतूकमंत्री गडकरी यांची घेतली भेट कोपरगावात फसवणूक

आरोपींची चौकशी केली असता त्यांची एक टोळी असून, ते नेहमी त्यांच्याजवळ बनावट नोटा बाळगतात. बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून आर्थिक व्यवहार करुन फसवणुक करत असल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथे सुमारे सात लाख रुपये किमंतीच्या बनावट नोटा दिल्या असल्याचे सांगितले. आरोपींविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.